Independence Day : हर शिखर तिरंगा मोहिमेत कळसूबाईवर फडकवणार तिरंगा..! कर्नल जामवाल यांची राष्ट्रीय स्‍तरावर मोहीम

Independence Day
Independence Daysakal

Independence Day 2023 : ‘हर घर तिरंगा’ मोहिमेतून नागरिकांमध्ये राष्ट्रभक्‍तीची भावना दृढ केली जात असतानाच कर्नल रणवीर सिंग जामवार यांनी ‘हर शिखर तिरंगा’ ही अनोखी मोहीम हाती घेतली आहे.

याअंतर्गत देशभरातील सर्व राज्‍यांना भेटी देताना तेथील सर्वोच्च शिखर सर करून तेथे राष्ट्रध्वज फडकविला जात आहे. ही मोहीम महाराष्ट्रात दाखल झाली असून, मंगळवारी (ता. १५) कळसूबाई शिखरावर श्री. जामवाल व त्‍यांची टीम तिरंगा फडकवणार आहे. (independence day in Har Shikhar Tiranga campaign national flag will be hoisted on Kalsubai mountain nashik news)

धीरांग (अरुणाचल प्रदेश) येथील केंद्रीय संरक्षण विभागाशी संलग्‍न नॅशनल इन्‍स्‍टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग ॲन्ड ॲडव्‍हेंचर स्‍पोर्टस्‌चे संचालक व प्राचार्य आहेत. त्‍यांना विशिष्ट सेवा पदक व विशिष्ट सेवा पदकाने गौरविले आहे.

तीनदा एव्‍हरेस्‍ट सर करताना त्‍यांनी आजपर्यंत जागतिक स्‍तरावर अनेक आव्‍हानात्‍मक शिखर सर करताना तिरंगा फडकविला आहे. तसेच गिर्यारोहण मोहिमांमधून त्‍यांनी रेस्‍क्‍यू ऑपरेशनदेखील यशस्‍वी केले आहे.

देशातील प्रत्‍येक राज्‍यातील सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकविण्याच्‍या उद्देशाने त्‍यांनी तीन महिन्‍यांपूर्वी ‘हर शिखर तिरंगा’ मोहीम हाती घेतली. तेव्‍हापासून ते विविध राज्‍यांना भेटी देताना तेथील सर्वोच्च शिखर सर करून तेथे तिरंगा फडकवत आहेत.

त्‍यांच्‍या या प्रवासात त्‍यांच्‍यासोबत सुबेदार रवी देवडकर, सुबेदार तस्‍वेसंग चोसगिल, हवालदार नेहपाल सिंग, राकेश यादव, केवल क्रिशन, नाईक गणेश पौल, लोगू के., संकय कुमार, लोबसंग बापू, रूपक छेत्री, थुपतेन, राजा रामाचार्य सम्‍यक राज मेहता यांचा समावेश आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Independence Day
Independence Day 2023: स्वातंत्र्यदिनी आपले घर आणि ऑफिस सजवा या सुंदर रांगोळीने, पाहा सुंदर डिझाइन

प्रत्‍येक राज्‍यात स्‍थानिक स्‍तरावर ‘निमास’चे माजी विद्यार्थी या मोहिमेशी जोडले जात असताना शिखर सर करत आहेत. या ऐतिहासिक मोहिमेंतर्गत कर्नल जामवाल व त्‍यांची टीम स्‍वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील कळसूबाई शिखरावर तिरंगा फडकविणार आहेत. यासाठी ते नागपूरमार्गे सोमवारी (ता. १४) नाशिकमध्ये दाखल झाले. येथे त्‍यांचे जल्‍लोषात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन ‘निमास’ची माजी विद्यार्थिनी चेतना शर्मा करत आहे.

हर शिखर तिरंगाचा प्रवास असा

अरुणाचल प्रदेश, मणिपूर, शिलाँग, आसाम, त्रिपुरा, नागालँड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्‍मू-काश्मीर, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, राजस्‍थान, गुजरात व मध्य प्रदेश या राज्‍यातील शिखर त्‍यांनी आजपर्यंत सर केले आहेत. महाराष्ट्रातील दौरा पूर्ण करताना ते गोव्‍याला रवाना होणार आहे. तेथून कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, ओडिशा, सिक्‍कीम, पश्‍चिम बंगाल या राज्‍यांतील सर्वोच्च शिखर सर करणार आहेत.

एक मोहीम मातृभूमी के लिए

कर्नल श्री. जामवाल कळसूबाई सर केल्‍यानंतर ‘एक मोहीम मातृभूमी के लिए’अंतर्गत आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. दुपारी अडीचला मुंढेगाव येथील शासकीय आश्रमशाळेत त्‍यांचा सत्‍कार होणार असून, त्यानंतर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. यानिमित्त सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार असून, विद्यार्थ्यांना या माध्यमातून प्रोत्‍साहन मिळणार आहे.

Independence Day
Independence Day Special : भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईतील १० महत्वाच्या गोष्टी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com