esakal | आयसोलेशन कोच रेल्वेस्थानकात धूळखात पडून; रुग्णांवर होऊ शकतात उपचार

बोलून बातमी शोधा

isolation coach
आयसोलेशन कोच रेल्वेस्थानकात धूळखात पडून; रुग्णांवर होऊ शकतात उपचार
sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वेस्थानकात २२ डब्यांच्या आयसोलेशन कोच प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ च्या मध्ये सध्या धूळखात पडून आहे. शहरात रुग्णसंख्या वाढलेली असताना जिल्हा प्रशासनाने मात्र आयसोलेशन कोचकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. आयसोलेशन कोच वापरात आणली तर अनेक रुग्णांवर या कोचमध्ये उपचार होऊ शकतात, असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. रुग्णालयात बेड न मिळणाऱ्या रुग्णांना आयसोलेशन कोचेसच्या माध्यमातून उपचार होऊन जीवदान मिळू शकते, अशी अपेक्षा नाशिककर व्यक्त करीत आहे.

कोचमध्ये उपचार होऊ शकतात

शहरात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे. यातच रुग्णालयांमध्ये बेड मिळणे मुश्कील झाले आहे. बेड मिळण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक धावाधाव करीत आहे. नाशिक रोड रेल्वेस्थानकात असणारी आयसोलेशन कोच सध्या धूळखात पडून आहे. या कोचमध्ये रेल्वेत खाद्यविक्री करणारे कामगार सध्या आसरा घेत आहे. गेल्या वर्षी रेल्वेने अटीतटीची वेळ आली, तर आयसोलेशन कोच तयार करून ठेवल्या होत्या. त्या वापरल्याच गेल्या नाहीत, मात्र आता कोरोनाचे संकट ओढावत आहे. गेल्या वर्षीपेक्षा चौपटीने रुग्णसंख्या रोजच वाढत आहे. यामुळे पर्यायी सुविधांचा बूस्टर डोस रुग्णांना मिळू शकतो.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : ती रुग्णवाहिका महिलेसाठी ठरली जीवनदायिनी..!

कोचेसमध्ये विलगीकरणही होऊ शकते

आयसोलेशन कोचमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध होऊ शकते. शिवाय सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी एका कोचमध्ये किमान १३ ते १५ लोक राहू शकतात. या कोचेमध्ये विलगीकरणही होऊ शकते. डॉक्टर वर्गाला उपचार करणे सोयीचे होऊ शकते. शिवाय आयसोलेशन कोच रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर थांबू शकतो. जेणेकरून इतर लोकांना कोरोना रुग्णांचा त्रास होणार नाही.

हेही वाचा: धडपड, आक्रोश अन्‌ हुंदक्‍यांनी नाशिक सुन्न! रुग्णालयात अंगावर काटा आणणारे दृश्‍य