Nashik: बाहेरगावी जाताना मालमत्तांची सुरक्षितता बाळगा; बंद घराची शेजाऱ्यांना माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन

House Robbery
House Robberyesakal

सिन्नर : सध्या दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या असून, बरेच नागरिक मूळ गावाकडे, देवदर्शन किंवा पर्यटनस्थळी फिरायला गेले आहेत.

घर बंद करून जाताना नागरिकांनी आपल्या मालमत्तांची सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन वावीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी केले आहे. (Keep belongings safe while going out Appeal of police to inform neighbors about closed house Nashik)

सहाय्यक निरीक्षक लोखंडे म्हणाले, की दिवाळीच्या पाश्‍र्वभूमीवर बसस्थानकांवर मोठी गर्दी होते. बसमध्ये चढताना किंवा उतरताना पाकिटे, किंमती वस्तू, मोबाईलची चोरी होते. नागरिकांनी प्रवास करताना मौल्यवान वस्तू संभाळाव्यात, घराबाहेर पडताना, दागिने अथवा मौल्यवान वस्तू अंगावर परिधान करू नये.

घर बंद करून बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना सांगावे. रात्री गस्त घालणाऱ्या गुरखाला आपण किती दिवस बाहेर आहोत, हे सांगावे. गावी जाताना घरातील मौल्यवान वस्तू, रोकड, दागिने बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावेत.

म्हणजे घरफोडीसारख्या घटना घडल्या, तर मोठे नुकसान टळेल. संबंधित सूचनांचे फलक त्यांनी कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीने गावातील मध्यवर्ती ठिकाणी प्रकाशित करावेत.

शेतात कामाला जाताना घराजवळील नागरिकांशी संपर्क ठेवावा. घरात वृद्ध व्यक्ती असेल, तर मुख्य दरवाजाला सेफ्टी डोअर बसवणे अधिक सुरक्षित राहील.

अनोळखी व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत घरात येऊ देऊ नाही. ही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आपला शेजारी घर बंद करून बाहेर गेल्यावर वारंवार त्याच्या घराकडे लक्ष ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

House Robbery
Nashik News: जलतरण तलाव, जॉगिंग ट्रॅक सुरू करा! पाचशेहून अधिक नागरिकांचा स्वाक्षरी मोहिमेत सहभाग

दुचाकीसाठी हवेत सेंसर लॉक

गावी जाताना दुचाकी सुरक्षिततेच्या दृष्टीने फक्त हँडल लॉकवर अवलंबून न राहता वाहन घराच्या कंपाउंडच्या आत लोखंडी साखळी कुलपासह लावावीत.

रात्री दुचाकी लॉक केल्यानंतर वाहनास कुठल्याही प्रकारचा स्पर्श झाल्यास किंवा हात लावल्यास सेन्सरद्वारे मोठ्याने आवाज होईल, असे लॉक बाजारात अथवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. नागरिकांनी या लॉकचा वापर करावा.

"अनेक जण गावी फिरायला अथवा देवदर्शनासाठी गेल्यावर व्हॅट्सॲप, फेसबुकवर फोटो टाकतात. घर बंद ठेवून बाहेर मौजमजा करताना सायबर गुन्हेगारांचा तुमच्यावर वॉच असतो. त्यातून पद्धतशीरपणे घरफोड्यांचे प्रकार घडतात. नागरिकांनी सुरक्षिततेसाठी घराबाहेर शक्य झाल्यास सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. परिसरात संशयास्पद व्यक्तीच्या हालचाली जाणवल्यास तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा ११२ या क्रमांकावर संपर्क करावा."

-चेतन लोखंडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, वावी

House Robbery
Nashik News: अनुकंपावरील नियुक्तीला गती; वारसदारांच्या आशा पल्लवित, पोलिस आयुक्तालयातर्फे अनुकंपा सूची जाहीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com