Nashik News: अनुकंपावरील नियुक्तीला गती; वारसदारांच्या आशा पल्लवित, पोलिस आयुक्तालयातर्फे अनुकंपा सूची जाहीर

Nashik Police Commissionerate
Nashik Police Commissionerateesakal

Nashik News : कर्तव्यावर सेवा बजावताना मृत झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे वारस गेल्या सहा वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत वारसदारांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

दरम्यान, पोलिस आयुक्तालयाने अनुकंपावरील नियुक्तीला गती दिल्याचे दिसून येत असून, ३७ उमेदवारांची अनुकंपा सूची जाहीर केली आहे. आयुक्तालयाच्या या निर्णयामुळे अनुकंपावरील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या वारसदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (Recruitment on compassionate grounds expedited Keeping hopes of heirs satisfied police commissionerate announced compassionate list Nashik)

शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत कर्तव्यावर असताना पोलिस कर्मचारी मृत झाले आहेत. या पोलिस कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपाच्या तत्त्वान्वये पोलिस दलामध्ये नियुक्ती करावयाची आहे.

२०२० ते २०२२ या तीन वर्षांतील अनुकंपावरील ३७ वारसदार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यातील पाच उमेदवारांची गेल्या जुलै महिन्यात ‘शासन आपल्या दारीच्या’च्या माध्यमातून नियुक्ती करण्यात आली आहे.

यात नीलेश निवृत्ती जाधव, पूजा दिलीप भदाणे, हर्षल अनिल जाधव, प्रवण भास्कर जगताप आणि प्रशांत सतीश देशमुख यांचा समावेश आहे.

उर्वरित अनुकंपावरील वारसदारांना अजूनही नियुक्तीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, शहर पोलिस आयुक्तालयाच्या प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांनी प्रतीक्षासूची नुकतीच जाहीर केली आहे.

यामुळे अनुकंपातील वारसदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पात्र वारसदारांना नियुक्तिपत्रे मिळणार असल्याने लवकरच ते पोलिससेवेत हजर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Nashik Police Commissionerate
Nashik News: यांत्रिकी झाडूने मुख्य रस्त्यांची झाडलोट; इटलीचे यांत्रिकी झाडू अखेर शहरात दाखल

कागदपत्रांची पडताळणी

२०२० पासून शहर अनुकंपा तत्त्वावरील वारसदार भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. येत्या काही दिवसांत वारसदारांची कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय चाचणीनंतर नियुक्तिपत्रे देत प्रशिक्षणाला सुरवात होण्याचे संकेत आहेत.

३७ उमेदवारांमध्ये बारावी, बी. कॉम., एम. कॉम., एम. एस्सी, बी. ई. मेकॅनिकल, डिप्लोमा उत्तीर्ण असे उच्चशिक्षित वारसदारांचा समावेश आहे. काही वारसदार पाल्यांची वयाची व शैक्षणिक अर्हतेची पूर्तता झालेली नाही.

त्यांची नावे निवडयादीत समाविष्ट असली तरी दोन्ही अर्हता पूर्ण झाल्यावरच त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

अनुकंपावरील वारसदार

पुरुष : ३१

महिला : सहा

Nashik Police Commissionerate
Nashik News: जलतरण तलाव, जॉगिंग ट्रॅक सुरू करा! पाचशेहून अधिक नागरिकांचा स्वाक्षरी मोहिमेत सहभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com