Nashik Leopard News : खोपडी बु. येथे बिबटया जेरबंद

तालुक्यातील खोपडी बु. येथील शिवारात मंगळवारी बिबट्या जेरबंद करण्यात आला असून. नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
Nashik Leopard News
Nashik Leopard Newsesakal

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : तालुक्यातील खोपडी बु. येथील शिवारात मंगळवारी बिबट्या जेरबंद करण्यात आला असून. नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. अनेक दिवसांपासून खोपडी येथील बेंद मळा परिसरातील नागरीकांना बिबट्यांचे सातत्याने दर्शन होत होते.

दोन दिवसांपूर्वी परिसरातील मेंढपाळाच्या कळपावर बिबट्याने हल्ला करत मेंढ्या जखमी केल्या होत्या. तसेच पाळीव कुत्र्यांचाही बिबट्याने फडशा पाडला होता. दिवसाढवळ्या नागरिकांनाही बिबट्याच्या जोडीने अनेक वेळा दर्शन दिले होते. (khopadi Bu Leopards are imprisoned here Citizens breathed sigh of relief nashik news)

परिसरातील शेतकऱ्यांनी याबाबत सरपंच गणेश घोलप, माजी सरपंच विजय गुरुळे यांना सांगीतले असता त्यांनी वनविभागाला याबाबत कळविले व पिंजरा लावण्याची मागणी केली.

वनविभागाने तात्काळ या परिसरात पिंजरा लावला असता पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्यचे सकाळी नागरिकांच्या लक्षात आले.

बिबट्याची रवानगी मोहदरी वनउद्यानायात करणार असल्याची माहिती वनविभागाने दिली. खोपडी बुद्रुक विजय रधु गुरुळे यांच्या मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला असुन आणखी एक बिबटया असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यानूसार पुन्हा याच परीसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे.

Nashik Leopard News
Nashik News : जवान हेमंत देवरे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

सिन्नर शहरात बिबट्याचे सातत्याने दर्शन

दोन दिवसांपूर्वी बिबट्याने शहरात फेरफटका मारत असल्याचा व्हिडिओ अनेकांच्या मोबाईलवर वायरल झाला होता. या व्हिडिओची शाह निशा करण्यासाठी अनेकांनी कॅमेऱ्याची व्हिडिओ बघितली यावेळी शहरात बिबट्या आल्याची वार्ता सगळीकडे पसरली होती.

या बिबट्याने बस स्थानक परिसरातील भगत मळा, सिन्नर शिर्डी रोड, मुक्तेश्वर नगर परिसरातील खंडोबा नाला तसेच कानडी मळा परिसरात या बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये बिबट्या विषयी भीती निर्माण झाली आहे.

लवकरात लवकर या बिबट्याला जेरबंद करावा अशी मागणी नागरिकांमधून होत असून बस स्थानक परिसरात पिंजरा वन विभागाने लावण्यात आलेला आहे. बिबट्या विषयी कोणतीही अफवा शहरात पसरू नये अशी सूचना संबंधित विभागाने नागरिकांना दिले आहे.

Nashik Leopard News
Nashik Police Helpline : व्हॉट्सॲप हेल्पलाईनच्या तक्रारींना आयुक्तालयाचा क्विक रिस्पॉन्स!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com