Nashik News : सोबतीने बालपण जगलो जगायचे आहे आता आयुष्यही! मोठ्या बहिणीकडून छोटीला नववर्षात किडनी भेट

त्याग, सोशिकतेबरोबरच प्रसंगी दुर्गेचा अवतार धारण करणारी व स्वतःच्या जिवाची पर्वा न करता दुसऱ्यांना जीवदान देणारी स्री मानव जातीचा आधार आहे.
From left elder sister Ranjana Sanap and right Aparna Burkul.
From left elder sister Ranjana Sanap and right Aparna Burkul.esakal

नांदूरमध्यमेश्‍वर : कर्तृत्ववान महिलांनीच जगाचा इतिहास घडवला आहे. त्याग, सोशिकतेबरोबरच प्रसंगी दुर्गेचा अवतार धारण करणारी व स्वतःच्या जिवाची पर्वा न करता दुसऱ्यांना जीवदान देणारी स्री मानव जातीचा आधार आहे.

याचाच प्रत्यय नुकताच शिवरे (ता. निफाड) येथील माजी सरपंच रंजना सानप यांच्या दातृत्वातून आला आहे. ( kidney gift from an elder sister to younger sister nashik news)

ताडदेव, मुंबई येथील त्यांची लहान बहीण अपर्णा बुरकुल (वय ४३) यांची दोन वर्षांपूर्वी किडनी निकामी झाल्याने त्यांना आठवड्यातून तीनदा डायलिसीस करावे लागत होते. किडनी मिळाल्यास त्यांचे आयुष्य वाढणार होते.

यासाठी रक्ताच्या नात्यातील कुणाची तरी किडनी आवश्यक होती. यामुळे जिवाची पर्वा न करता लहान बहिणीला जीवदान मिळाले पाहिजे, या प्रेमापोटी रंजना सानप यांनी आपली किडनी देऊन लहान बहिणीचे प्राण वाचवत आयुष्य वाढण्यासाठी नववर्षाची भेट दिली आहे.

कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी, निर्णय घेण्याची क्षमता, कुटुंबाचे पाठबळ आणि सरपंचपद भूषविलेले असल्याने समाजसेवेचा जवळून अनुभव असलेल्या सानप यांनी लहान बहिणीचा जीव वाचण्यासाठी स्वतःची किडनी देऊ केली.

From left elder sister Ranjana Sanap and right Aparna Burkul.
Nashik News : नोटिसांद्वारे विरोधकांना धमकाविण्याचे काम : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे

डॉक्टरांच्या सल्ल्याने काही तपासण्या करून किडनी जुळत असल्याने परेल, मुंबई येथील ग्लोबल दवाखान्यात किडनी रोपण शस्त्रक्रिया झाली. दोन्ही बहिणींची प्रकृती ठणठणीत आहे.

"शिवरे गावचे सरपंचपद भूषविलेले असल्याने समाजसेवेचा वसा कायम आहे. कुटुंबाला वारकरी संप्रदायाचा संस्कार असल्याने कुटुंबातील सदस्यांनीही किडनी देण्यास संमती दिली. लहान बहिणीला जीवदान मिळून तिचे आयुष्य वाढले, याचा आनंद आहे." - रंजना सानप, माजी सरपंच, शिवरे

From left elder sister Ranjana Sanap and right Aparna Burkul.
Nashik ZP Exam Result : विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक परिक्षेचा निकाल घोषित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com