नाशिकला सराव करणाऱ्या कोमल जगदाळे हिने पटकावले रौप्‍य पदक

इंडियन ग्रँड प्रिक्‍स-४ स्‍पर्धेत कोमल जगदाळेला रौप्‍यपदक
इंडियन ग्रँड प्रिक्‍स-४ स्‍पर्धेत कोमल जगदाळेला रौप्‍यपदकesakal

नाशिक : भुवनेश्‍वर (ओडिसा) येथे झालेल्‍या इंडियन ग्रँड प्रिक्‍स-४ या क्रीडा स्‍पर्धेत नाशिकला सराव करणाऱ्या कोमल जगदाळे हिने रौप्‍य पदक पटकावले. तीन हजार मीटर स्टीपलचेस या क्रीडा प्रकारात महिला गटातून धावताना तिने ही कामगिरी केली आहे.

यापूर्वी इंडियन ग्रँड प्रिक्‍स ३ या क्रीडा स्‍पर्धेत नाशिकच्‍या संजीवनी जाधव हिने पाच हजार मीटर महिला गटातून सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्‍यातच मंगळवारी (ता.२४) या इंडियन ग्रँड प्रिक्‍स-४ या क्रीडा स्‍पर्धेत सहभागी होताना कोमल जगदाळे हिने रौप्‍य पदक पटकावले आहे. तिने तीन हजार मीटर स्टीपलचेस या क्रीडा प्रकारात महिला गटातून सहभागी होताना ही कामगिरी केली.

इंडियन ग्रँड प्रिक्‍स-४ स्‍पर्धेत कोमल जगदाळेला रौप्‍यपदक
नरिंदर बत्रांचा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

या गटातून उत्तर प्रदेशकडून सहभागी झालेली पारुल चौधरी हिने ९ मिनिटे ४२.२४ सेकंद अशी वेळ नोंदविताना सुवर्णपदक पटकावले. नाशिकला सराव करणाऱ्या कोमलने १० मिनिटे ००.२० सेकंद अशी वेळ नोंदविताना द्वितीय क्रमांकासह रौप्‍य पदक पटकावले. या गटातून उत्तरप्रदेशच्‍या काजल शर्मा हिने १० मिनीटे २३.१० सेकंद अशी वेळ नोंदविताना तिसऱ्या क्रमांकासह कांस्‍य पदक पटकावले आहे. कोमल नाशिकच्‍या खेलो इंडिया भोसला सैनिकी विद्यालय केंद्रावर सराव करते. प्रशिक्षक विजेंद्र सिंग हे खेळाडूंसमवेत स्‍पर्धास्‍थळी उपस्‍थित आहेत.

इंडियन ग्रँड प्रिक्‍स-४ स्‍पर्धेत कोमल जगदाळेला रौप्‍यपदक
क्रीडा सुविधांकडे दुर्लक्षच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com