Nashik News: लासलगाव बाजार समिती राज्यात प्रथम! पणन संचालनालयाने केली क्रमवारी जाहीर

Lasalgaon Market Committee.
Lasalgaon Market Committee.esakal

लासलगाव : सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या बाजार समित्यांची क्रमवारी राज्याच्या पणन संचालनालयाने आर्थिक वर्षातील कामगिरीच्या आधारावर जाहीर केली आहे.

यात नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समितीने पहिला क्रमांक पटकावला आहे. (Lasalgaon Market Committee first in state Directorate of Marketing announced ranking Nashik News)

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत राज्यात मागील वर्षापासून बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात येत आहे.

बाजार समित्यांची आर्थिक वर्षाच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली.\राज्यातील एकूण ३०५ बाजार समित्यांपैकी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समिती संयुक्तरीत्या पहिल्या क्रमांकावर आहे.

वाशीम जिल्ह्यातील कारंजा (लाड) बाजार समिती दुसऱ्या, तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बाजार समिती तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती राज्याचे पणन संचालक डॉ. केदारी जाधव यांनी दिली.

Lasalgaon Market Committee.
Dasara: येवल्यात विजयादशमीनिमित्त सामुदायिक सीमोल्लंघन! 350 वर्षांची परंपरेचे जतन, बालाजीच्या रथाचीही मिरवणूक

क्रमवारीच्या अटी

बाजार समित्यांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी पणन संचालनालय कार्यालयाकडून जागतिक बँकेच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेसाठी बाजार समितीत असलेल्या पायाभूत व इतर सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, योजना, उपक्रम राबविण्यातील सहभाग यानुसार एकूण ३५ निकष तयार केले होते.

या निकषाशी संबंधित माहितीची तालुका व जिल्हास्तरीय समित्यांनी तपासणी करून एकूण २०० गुणांपैकी गुण दिले आहेत.

या गुणांच्या आधारावर राज्यातील बाजार समित्याची २०२२-२३ या वर्षाची क्रमवारी (रॅकिंग) निश्चित करण्यात आली आहे. यात कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समितीला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

Lasalgaon Market Committee.
Railway News: दिवाळीनिमित्त रेल्वेतर्फे 36 उत्सव रेल्वेगाड्या! 2 विशेष मेमू रेल्वेही धावणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com