
Nashik Leopard Attack : येथील शिवारात शेततळ्यात पाऊस झाला की नाही हे पाहण्यासाठी पिकांना पाणी देण्यासाठी जाणाऱ्या मेंढीच्या शेतकरी युवकावर बिबट्याने हल्ला केला.
त्यात बिबट्याने शेतकऱ्यांच्या डोक्याला, पाठीला अन् पोटाला तीक्ष्ण पंजाच्या साहाय्याने घायाळ केले आहे. गंभीररित्या जखमी झालेल्या युवकाला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. आज (शुक्रवारी ता.२८) सकाळी सव्वा सहाच्या सुमारास घटना घडली आहे. (Leopard attack on farmer youth nashik newे)
खडांगळी सोमठाणे शिवारात मेंढी चौफुलीच्या पुढे गिते कोकाटे वस्ती आहे. शेतकरी सोमनाथ गिते शाम कोकाटे गिरणीवाले यांचे शेतमळे आहे. कृष्णा सोमनाथ गिते ( वय १७) सकाळी शिवारात शेततळ्यात पाऊस चांगला झाला की नाही हे पाहण्यासाठी गेला. भीज पाऊस नसल्यास वीजपंप सुरू करून पाणी पिकांना दे असे त्याच्या वडिलांनी सांगितले.
त्यामुळे सोमठाणे मेंढी च्या खोलवाटाने शेताकडे गेला. हा खोलवाटाचा जुनाट रस्ता व दाट झाडांचा आहे. सकाळीची वेळ असल्याने पायी वस्तीपासून कृष्णा जात होता. त्यावेळी खोलवाटात दडी मारून बसलेल्या बिबट्याने पाठी मागून हल्ला चढवला. त्यामुळे तो घाबरला.
बिबट्याने सकाळी सावज हेरले. तीक्ष्ण पंजाच्या साह्याने डोक्यावर वार केले. कानाच्या बाजूने चावा घेतला आहे. बिबट्या हिंसक हल्ला करत असताना कृष्णा समयसूचकता दाखवली. खोलवाटाच्या दिशेने स्थिर होऊन शेततळ्याच्या बाजूने उंच भागावर आला. घायाळ अवस्थेत जागीवर स्थिर होऊन परिसरातील शेतकरी बांधवांनी बोलविण्यासाठी आरडाओरडा केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामुळे कृष्णा मदतीसाठी सुनील रुकारी परिवार शाम कोकाटे परिवार सह शेतकरी धावले. त्यांनी घायाळ कृष्णाला बिबट्या पासून सोडविले. शेतकरी जमा झाल्याने बिबट्या दाट झाडांचा दिशेने पळून गेला आहे. घायाळ झालेल्या कुष्णाला वडांगळीला डॉ माणिक अडसरे यांच्या दवाखान्यात आणले.
श्री.अडसरे यांनी उपचार केले. मात्र बिबट्याने डोक्याला पोटाला व पाठीला तीक्ष्ण पंजाच्या घायाळ खुणा आहेत. त्यामुळे त्यांना नाशिकला जिल्हा रुग्णालयात दाखल करा असे सांगितले. घायाळ कृष्णा गितेला सुनील रुकारी, आई सुनिता गिते यांनी नाशिकला घेऊन गेले आहे.
ह्या शिवारात कुष्णाचा चुलत भाऊ शाळकरी मुलगा वैभव नवनाथ गिते यांच्यावर पाच वर्षांपूर्वी बिबट्याने हल्ला केला होता. आज पुन्हा खोलवट भागात बिबट्याने युवक जखमी केल्याने शेतकरी वर्ग मध्ये घबराट पसरली आहे. सिन्नर वनविभागाने पिंजरा उभारावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.