नाशिक : बिबट्याच्या वावराचा शेतीला फटका | Leopard | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bibtya (leopard)

Nashik | बिबट्याच्या वावराचा शेतीला फटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवानाशिक : येथील सावरगाव- गंगावऱ्हे परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, परिसरातील पाळीव प्राण्यांना भक्ष केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. शेतातील पिकांना पाणी द्यायला जाताना मनात बिबट्याची दहशत कायम असल्याने अनेकजण रात्रीच्यावेळी घराबाहेर पडायला धजावत नाहीयेत.

बिबट्याच्या दहशतीचा परिणाम शेती पिकांवर

सावरगाव- गंगावऱ्हे हा बागायती परिसर असून, अनेक फार्महाऊसदेखील या परिसरात आहेत. त्यामुळे या परिसरात लोकवस्ती अधिक आहे. अनेक शेतकऱ्यांना शेतात पिकांना पाणी देण्यासाठी रात्री घराबाहेर पडावे लागते, मात्र बिबट्याच्या भीतीपोटी तेही घराबाहेर पडायला घाबरतात. याचा थेट परिणाम हा शेती पिकांवर होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ सुद्धा सोसावी लागते आहे. सदर बिबट्याने महिनाभरात २ गायी व २ पाळीव कुत्रे फस्त केल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून पिंजरा लावण्यासाठी सावरगाव- गंगावऱ्हे ग्रामपंचायत व पोलिस पाटील यांच्याकडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे.


हेही वाचा: नाशिकच्या लेण्यांमध्ये आढळला प्राचीन रोमन खेळाचा पट! | Nashik

''माझे स्वतःचे दोन पाळीव कुत्रे बिबट्याने फस्त केले आहेत. बिबट्याच्या भीतीपोटी शेतीच्या मशागतीसाठी रात्री घराबाहेर पडणेही आता भीतीदायक झाले असून, यामुळे शेतीचे नुकसान होते आहे. वनविभागाने त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा.'' - अनिल धोंगडे , स्थानिक रहिवासी

हेही वाचा: Nashik | 13 हजाराचे खैर जप्त; वनविभागाच्या गस्ती पथकाची कारवाई

loading image
go to top