Nashik News : नाशिक एअरपोर्टवर बिबट्याचे दर्शन!

Leopards roaming the runway area
Leopards roaming the runway areaesakal

मोहाडी (जि. नाशिक) : नाशिक विमानतळावर गुरुवारी (ता. २९) सकाळी साडेआठच्या सुमारास धावपट्टीनजीक बिबट्याचे दर्शन झाल्याने सुरक्षारक्षकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

नाशिक एअरपोर्ट हद्दीत बिबट्यांचे वास्तव्य असून, या अगोदर दोनदा बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. परंतु गुरुवारी (ता.२९)सकाळी साडेआठच्या सुमारास धावपट्टीच्या अत्यंत जवळ बिबट्याचे दर्शन झाल्याने सुरक्षारक्षकांत एकच खळबळ उडाली. (Leopard sighting at Nashik Airport Nashik News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Leopards roaming the runway area
Nashik News : सटाण्यात दिवसाढवळ्या घरफोडी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक एअरपोर्टवरून सध्या दिल्ली, हैदराबाद, या दोन शहरांसाठी विमानसेवा सुरू असून, या दोन्ही विमानसेवांच्या वेळा सकाळी ७.५०, ८.१०, १०.५० व ११.२० अशा आहेत. सध्या या विमानतळावरून अतिशय मर्यादित सेवा सुरू आहे.

मात्र गुरुवारी (ता. २९ )सकाळी ८.१० ला विमानाने हैदराबादकडे उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात बिबट्याने धावपट्टीवर दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने याबाबत वन विभागाला या घटनेची माहिती दिली आहे की नाही, याबाबतची माहिती कळू शकली नाही.

Leopards roaming the runway area
Nashik News : कांद्याचे क्षेत्र वाढल्याने रोपांसाठी शेतकरी त्रस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com