Nashik News: कुपोषित बालकाचा मृत्यू

Death
Deathesakal

Nashik News : कुपोषणाच्या गंभीर समस्येवर शासनस्तरावरून सातत्याने उपाययोजना सुरू असतानाही अद्याप कुपोषणाचा नायनाट होऊ शकलेला नाही. शहरात कुपोषणामुळे दोन महिन्यांच्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Malnourished child dies Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death
Nigeria Accident News : नायजेरियात बोट बुडून मोठा अपघात! 26 शेतकऱ्यांचा मृत्यू

ऋतू सागर वाघ (वय दोन महिने आठ दिवस) असे मृत बालकाचे नाव आहे. ऋतू घरी असताना शनिवारी (ता. ९) त्याला वेदना होऊन त्रास होऊ लागला. त्यानंतर आई-वडिलांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

उपचार सुरू असताना डॉ. जाधव यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. ऋतू जन्मतःच कुपोषित होता. तसेच त्याच्या शरीराची पूर्ण वाढ झालेली नसल्याचे डॉक्टरांच्या पाहणीतून समोर आले.

कुपोषणासह शरीराची नैसर्गिकरीत्या वाढ झालेली नसल्याने तो अशक्तच होता. याबाबत जिल्हा रुग्णालयात मृत्यूची नोंद झाली असून, सातपूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

Death
Malvan Accident : कळपातील माकडाने रिक्षात उडी मारल्याने चालक जागीच ठार; डोक्याला गंभीर दुखापत अन्..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com