Nashik Water Scarcity : येवल्यात टंचाईची दाहकता वाढली; संपूर्ण दिवस जातो पाण्याच्या शोधात!

In the eastern part including Kolgaon, the citizens rushed to fill water in the shortage-affected villages.
In the eastern part including Kolgaon, the citizens rushed to fill water in the shortage-affected villages. esakal

Nashik News : विक्रमी पाऊस होऊनही यंदा पाणीटंचाईने डोके वर काढले असून वाढत्या उष्णतेबरोबर तळपत्या सूर्याने तालुक्यातील भूगर्भातील पाणी बेपत्ता केल्याचे चित्र गावोगावी आहे.

पाणीटंचाईचा उद्रेक झाला असून पाणीबाणी स्थितीत १८ टँकरद्वारे ३२ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. (supply water to 32 family by 18 tank in water shortage situation yeola nashik news)

टंचाईच्या या उद्रेकात अलनिनोच्या प्रभावामुळे पालखेड डाव्या कालव्याच्या पिण्याचे आवर्तनही बेभरवशाचे झाले आहे. परिणामी शहर व तालुक्याचे आगामी दिवसाचे टेन्शन वाढले आहे. यावर्षी तालुकाभर विक्रमी पाऊस पडला असला तरी फेब्रुवारीपासूनच अनेक गावातील जलस्रोत कोरडे होऊन कांदे जगवण्यासाठी विकत पाणी घेण्याची वेळ आली होती. आता तर चित्र अजूनच भयावह आहे.

शहरवासीयांना तर सहाव्या दिवशी नळाला पाणी मिळत असून शहराच्या साठवण तलावाच्या भरवशावरच गावोगावी सुरु असलेल्या टॅंकरमध्ये पाणी भरले जाते. त्यामुळे आवर्तनावरच सर्वकाही अवलंबून असल्याने चिंता वाढली आहे. सध्या ३८ गाव पाणीपुरवठा योजनेमुळे ५५ वर गावे टँकरमुक्त झाले असल्याचा आनंद आहे, मात्र उत्तरपूर्व भागातील ६० वर गावे व वस्त्या उन्हाळ्यात टंचाईच्या फेऱ्यात अडकत आहेत.

सध्या पूर्व भागातील गावात जलस्रोत कोरडे पडल्याने पाणीच उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. यामुळेच अनेक गावात व वाडय़ावस्त्यांवर तर सकाळी दिवस उजाडल्यापासून वेध लागतात ते पाण्याचे टँकर येण्याचे. केव्हा टँकर येईल आणि रस्त्याच्या कडेला असलेले टिप भरून देईल अशी अवस्था गावोगावी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

In the eastern part including Kolgaon, the citizens rushed to fill water in the shortage-affected villages.
Water Shortage : वरणगावात 10 दिवसांआड पाणीपुरवठा; शहरात कृत्रिम पाणीटंचाई

गावोगावी जलस्रोतांना थेंबभरही पाणी नसल्याने ग्रामस्थांना पूर्णतः टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. वाड्या वस्त्यांवरील चित्र तर अजून भयावह असून नागरिकांना रस्त्याच्या कडेला पाण्यासाठी टीप ठेवावे लागत आहे. उत्तर पूर्व भागातील सर्वच गावात टँकरने भरले जाणारे हे टीपच तहान भागविण्यासाठी आधार ठरत आहेत. टँकर येईल तेव्हाच कुटुंबीयांच्या घरात पाणी पोहोचते. त्यामुळे टॅंकर आला, की टीप भरून घेण्यासाठी जणू स्पर्धा सुरु होते असे चित्र आहे.

परिस्थिती आणखी भीषण होणार

आजमितीस ३२ गावे-वाड्यांवर रोज ३५ खेपातून पाच लाख लिटर पाणी पुरविले जात आहे. पाऊस लांबल्यास येणाऱ्या दिवसांत तालुका किती होरपळणार याची कल्पनाही आता करवत नसल्याची स्थिती आहे.

वाढत्या उन्हासोबत टॅंकर सुरू करण्याची मागणी आता वाढू लागली असून आजमितीला ११ खासगी व ७ शासकीय टॅंकरने रोज ३५ खेपा पाणीपुरवठा केला जात आहे. हे टॅंकर शहरानजीकच्या नांदूर विहिरीवरुन भरले जात असून सरासरी १४ हजार लिटर पाणी एका खेपेला असे ५ लाख लिटर पाणी रोज नागरिकांची तहान भागवत आहे. हे पाणी पिण्यासह वापरासाठी उपयोगात आणले जात असून यावरच जनावरांची देखील गरज भागवली जात आहे.

In the eastern part including Kolgaon, the citizens rushed to fill water in the shortage-affected villages.
Water Crisis: आदिवासी भागात पाण्यासाठी महिलांची पायपीट; इगतपुरी तालुक्यातील वाड्यापाड्यांवर मे महिन्यातच झळा!

मागणी होताच टॅंकर पुरवा

मार्चमध्ये मागणी होऊनही थेट ११ एप्रिलला तालुक्यातील टॅंकर मंजूर झाले आहे. सध्या आहेरवाडी, जायदरे, चांदगाव, ममदापूर, खरवंडी, देवदरी, वसंतनगर, अंकाई, गोरखनगर, सायगाव, नगरसूल, लहित, हडपसावरगाव, पांजरवाडी, पिंपळखुटे बुद्रूक, भूलेगाव, कासारखेडे, कोळगाव,

वाईबोथी, कोळम खुर्द, कोळम बुद्रूक, आड सुरेगाव, गारखेडे, सोमठाण जोश, रहांडी, वाघाळे, खामगाव, देवठाण, नायगव्हाण या गावांमधील तसेच वस्त्यांवर टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. पूर्व भागात टंचाई अधिक असून मागणी होताच दिरंगाई न करता टॅंकरने पाणीपुरवठा केला जावा अशी मागणी माजी सभापती प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.

"आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार सर्व गावे व वस्त्यांवर पाणीपुरवठा सुरू आहे. ग्रामपंचायतीकडून आलेल्या प्रस्तावावर तातडीने पुढील कारवाई केली जाते. सध्या नांदूर विहिरीवरून टँकर भरले जात असून रोज ३५ खेपांद्वारे पाणी पुरविले जाते. टंचाईवर प्रशासन लक्ष ठेऊन असून दक्षता घेतली जाते." - सजन घुनवट, पाणीपुरवठा प्रमुख, पंचायत समिती, येवला

In the eastern part including Kolgaon, the citizens rushed to fill water in the shortage-affected villages.
Nashik News : ट्रक चालकाचा मालेगावात उष्माघाताने मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com