Nashik News: आशा असलेल्या झेंडूनेही केला शेतकऱ्यांचा घात! भाव घसरल्याने रस्त्यावर टाकून दिली फुले

Flowers left by the roadside in the evening by flower farmers on the road in Deola.
Flowers left by the roadside in the evening by flower farmers on the road in Deola.esakal

देवळा : यंदा पावसाचे प्रमाण आधीच कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी खरिपाचे पीक उपटून तेथे झेंडूची लागवड केली होती. कळवण, बागलाण तालुक्यातही काही प्रमाणात हीच स्थिती होती, त्यामुळे यंदा झेंडूचे मुबलक प्रमाणात आगमन झाले.

पावसाच्या भितीने सर्वच शेतकऱ्यांनी झेंडू काढत बाजारास विक्रीस आणला होता,मात्र थोड्याफार उत्पन्नाची आशा असलेल्या झेंडूने आज त्यांची साप निराश केली.

काल रात्री असलेला पन्नास रुपयांचा भाव आज सकाळी तीस आणि दुपारनंतर तर चक्क पाच रुपयांवर आल्याने शेतकरी अक्षरशः रस्त्यावर फुले टाकून हताशपणे निघून गेले.

वाहतुकीचा खर्चही निघाला नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ आली. (marigold ambushed farmers Flowers thrown on streets due to falling prices Nashik News)

दसऱ्याच्या दिवशी झेंडूंच्या फुलांची आवक जास्त व त्यामानाने मागणी कमी असल्याने फुलांचे भाव कोसळले. सायंकाळी अक्षरशः फुले टाकून फूलउत्पादक शेतकऱ्यांना निघून जावे लागले. काही शेतकऱ्यांनी क्रेट भरून तर काहींनी ट्रकटरवर फुले आणली.

दुपारपर्यंत कसेतरी सरासरी २० ते ३० रुपयांपर्यंत भाव टिकून होते. परंतु फारशी विक्री होत नसल्याचे पाहून या विक्रेत्यांनी पाच दहा रुपये किलो आणि अंदाजानेच फुलांची विक्री केली.

मात्र तरीही फुलांची विक्री न झाल्याने फुले तशीच टाकून देत निराश मनाने हे फुलउत्पादक शेतकरी व त्यांचे कुटुंबीय घराकडे परतले.

दसऱ्याला झेंडूंच्या फुलांचे मोठे महत्त्व असते. प्रत्येकजण झेंडूच्या फुलांच्या माळा घराला, दुकानाला, गाडीला व इतर ठिकाणी लावत कृतज्ञता व्यक्त करतो. त्यासाठी या सणाला झेंडूंच्या फुलांना मोठी मागणी असते.

Flowers left by the roadside in the evening by flower farmers on the road in Deola.
Nashik: कृषी विभागाच्या योजनांना शिवरायांचे नाव! मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानातील अडचणीही केल्या दूर

देवळा शहरात तसेच रस्त्यांवर या लाल-पिवळ्या फुलांची आवक चांगली होती. सकाळी ४० रुपये प्रति किलो असणारा भाव दुपारनंतर कोसळत गेला.

हातात फुलांच्या माळा घेत ग्राहकांना आर्जव करणारे लहान मुले व विक्रेते पाहून आणि शेतकऱ्यांची ही अवस्था मन हेलावणारे होते. झेंडूंच्या फुलांच्या माळाही १० रुपयांदरम्यान होत्या.

दसरा हा सण आनंदाचा, उत्साहाचा, चैतन्याचा असला तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने तो निराशामय ठरत आहे. त्यात सध्या ज्या झेंडूच्या फुलांच्या भरवशावर शेतकरी आशा ठेवून होता, त्या फुलांना कवडीमोल भाव मिळाल्याने अक्षरशः शेतकऱ्यांना खुडलेली फुले फेकून द्यावी लागत आहेत.

बाजारात आठ-दहा रुपये किलो भाव असला तरी तशीही मंदीच दिसत आहे. त्यात भावाने दगा दिल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

Flowers left by the roadside in the evening by flower farmers on the road in Deola.
Nashik: शेतकऱ्यांना कापणी मजुरी परवडेना अन पशुपालकांनाही गरज असल्याने तडजोड करीत साठवणूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com