Medical Admission : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश नोंदणीची शनिवारपर्यंत मुदत; जाणून घ्या प्रवेशाचे वेळापत्रक

medical Student
medical Studentesakal

Medical Admission : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी नोंदणीप्रक्रियेला सुरवात केलेली आहे.

जाहीर वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेत सहभागासाठी आवश्‍यक नोंदणी करण्यासाठी शनिवार (ता. २९)पर्यंत मुदत दिलेली आहे. (medical courses admission Deadline for registration is till 29 july nashik news)

देशातील अन्‍य राज्‍यांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशप्रक्रियेला गती आलेली असताना महाराष्ट्रात मात्र प्रक्रिया सुरू झालेली नव्‍हती. नीट २०२३ परीक्षेचा निकाल लागून एक महिना उलटूनही प्रवेशप्रक्रिया सुरू होत नसल्‍याने विद्यार्थी व पालक चिंतित होते. अशात सीईटी सेलने प्रवेशाचे वेळापत्रक जारी करताना विद्यार्थी व पालकांना दिलासा दिला आहे.

प्रवेशप्रक्रियेला गती आल्‍याने विद्यार्थी व पालकांकडूनही समाधान व्‍यक्‍त केले जात आहे. सर्व प्रकारच्‍या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशाच्‍या नोंदणीप्रक्रियेला सुरवात झालेली आहे.

असे असले तरी सध्या एमबीबीएस आणि बीडीएस या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्‍या पहिल्‍या निवड यादीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. लवकरच अन्‍य अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाचे सविस्‍तर वेळापत्रक जारी केले जाणार असल्‍याचे स्‍पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

medical Student
Medical Diploma : विद्यार्थ्यांना फेलोशिप आणि डिप्लोमा पदवी देणारे 26 अभ्यासक्रम रद्द; MEDD ची मोठी कारवाई

या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू

एमबीबीएस, बीडीएस, आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस), युनानी (बीयूएमएस), फिजिओथेरपी, ॲक्युपेशनल थेरपी आदी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्षात प्रवेशासाठी ही प्रक्रिया पार पडते आहे.

असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक-

- अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश नोंदणीची मुदत ----------------- २९ जुलै

- नोंदणी शुल्‍क भरणे, कागदपत्र अपलोडची मुदत ------- ३० जुलै

- एमबीबीएस, बीडीएससाठी प्राधान्‍यक्रम अर्जाची मुदत ---- १ ते ३ ऑगस्‍ट

- एमबीबीएस, बीडीएसची पहिली निवडयादी -------------- ४ ऑगस्‍ट

- प्रवेश निश्‍चितीच्‍या प्रक्रियेची मुदत ---------------------- ५ ते ९ ऑगस्‍ट

medical Student
Medical Admission: वैद्यकीयच्या प्रवेशासाठी नोंदणी आजपासून; सविस्‍तर वेळापत्रकाची प्रतीक्षा कायम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com