नाशिक : निर्यातक्षम द्राक्ष, आंबा, डाळिंब, संत्रा व भाजीपाला पिकांची २०२०-२१ साठी हॉर्टिनेट प्रणालीमध्ये शेतकऱ्यांना आता घरबसल्या नोंदणी करता येणार आहे. यासाठी निर्यातक्षम पीक उत्पादकांसाठी मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अडचण असल्यास कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क
अँड्राईड मोबाईल ॲपमध्ये गुगल प्ले स्टोअरमधून ‘ॲपेडा’चा अर्ज नोंदणीसाठी मोबाईल ॲप शेतकऱ्यांना डाउनलोड करावे लागेल. http://play.google.com/store/apps/details?id|=in.gov.apeda.apedaapp या लिंकवर क्लिक करायचे आहे. स्वतःचे नाव, मोबाईल, आधारकार्ड क्रमांक, ई-मेल आयडी ही माहिती भरल्यानंतर शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी अधिकाऱ्याकडे अर्ज करण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध होत आहे. काही अडचण असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. विहित मुदतीत बागांचे नोंदणी, नूतनीकरण करण्यासाठी मोबाईल ॲपचा वापर करावा, असे फलोत्पादन संचालक कैलास मोते यांनी म्हटले आहे.
या प्रणाली विकसित
कीडनाशक उर्वरित अंश व कीडरोगमुक्त उत्पादनाची हमी देण्यासाठी ‘ॲपेडा’ने निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी ग्रेपनेट, मँगोनेट, अनारनेट, सीट्रसनेट व व्हेजनेट या प्रणाली विकसित केल्या आहेत. त्यातंर्गत शेतकऱ्यांना नोंदणी व नूतनीकरणासाठी ॲपेडाने विकसित केलेल्या सुधारित मानांक पद्धतीतील ॲनेक्झर-१ नुसार शेतकऱ्यांनी ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने नोंदणी अर्ज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करता येतो. यंदा निर्यातीस चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम बागांच्या नोंदणीचा लक्षांक कृषी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आला आहे.
मोबाईल ॲपद्वारे सुविधा
कोरोना विषाणू संसर्गामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे जाणे- येणे अडचणीचे आहे. त्यापासून मुक्तता करण्यासाठी फलोत्पादन विभागाने ॲपेडा कार्यालयातर्फे अर्ज नोंदणी कनेक्ट मोबाईल ॲपद्वारे करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी राज्यस्तरावरून नुकतीच अधिकारी, सहभागी संस्था आणि शेतकऱ्यांची वेबिनार कार्यशाळा घेण्यात आली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.