Nashik News: धोंडा पाहुणचार ठरला अखेरचा; घराजवळील वीजतारांच्या धक्क्याने मायलेकीचा मृत्यू

Death News
Death Newsesakal

Nashik News : येथील जुन्या जानोरी रस्त्यावरील दत्तनगरमध्ये राहणाऱ्या सोनवणे कुटुंबातील आई आणि मुलगी गच्चीवरून पेरू तोडत असताना हातातील लोखंडी गज उच्चदाबाच्या विजेच्या तारांना लागून विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडल्या.

या घटनेचे वृत्त समजताच नाशिकहून ओझरला येणाऱ्या मुलाचाही अपघात झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. संपूर्ण ओझर गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या भागातील घरांना खेटून असलेल्या उच्चदाबाच्या तारांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (mother daughter died after being hit by power lines near house at ozar Nashik News)

कैलास धामोरे यांच्या दत्तनगरमधील घरात भाडेतत्त्वावर राहणाऱ्या व होलसेल टेक्स्टाईल दुकानात कामास असलेल्या मीना हनुमंत सोनवणे (मूळ रा. गोळे गोंदेगाव, विंचूरजवळचे) यांनी मुलगी आकांक्षा आणि जावई राहुल यांना अधिक मासानिमित्त पाहुणचारासाठी बोलावले होते.

रविवारी (ता. ६) दुपारच्या जेवणानंतर साडेबाराच्या सुमारास आकांक्षा व मीना या मायलेकी गच्चीवर गेल्या. झाडाला लगडलेले पेरू बघून गच्चीवर पडलेल्या गजाने त्या पेरू तोडण्याचा प्रयत्न करू लागल्या.

परंतु गच्चीवरून अगदी काही अंतरावरून जाणाऱ्या उच्चदाबाच्या वीजवाहाक तारा त्यांच्या लक्षात न घेता पेरू ओढायला लागल्या. तारांमध्ये उच्चदाब असल्याने रॉडचे आकर्षण झाले आणि विजेचा धक्का लागून त्या जागीच फेकल्या गेल्या.

त्यात आई मीना हनुमंत सोनवणे (४३) व मुलगी आकांक्षा राहुल रणशूर (२२) या मायलेकीचा जळून मृत्यू झाला. गज तारांना लटकल्यामुळे गच्चीवरील पाण्याची टाकीही फुटली. संपूर्ण घराच्या गच्चीवर पाणी असल्याने त्यात वीजप्रवाह उतरला होता.

मीनाबाई यांचे जावई राहुल रणशूर व त्यांच्या दोन्ही मुलांनाही विजेचा जोरदार धक्का लागल्याने तेही लांबवर फेकले गेले. मात्र सुदैवाने ते त्यातून बचावले. त्यांचा आरडाओरड व आक्रोशाने जवळपासचे नागरिक धावले.

मात्र घराच्या चहूबाजूला विजेचा धक्का बसत असल्याने सर्वांचा नाईलाज होत होता. महत्तप्रयत्नांनी विजेचा प्रवाह बंद करण्यात आला. त्यानंतर नागरिक बचावासाठी गेले. परंतु त्याआधीच दोघींचा होरपळून मृत्यू झाला होता.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी पिंपळगाव येथे नेण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे ओझर शहरावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death News
Crime News: बीड हादरलं! विधवा महिलेवर चालत्या जीपमध्ये केला बलात्कार अन्...

मुलाचाही अपघात

मीना सोनवणे यांचा मुलगा अभिषेक महापालिकेच्या सिटीलिंक बस विभागात सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. घटना समजताच तो घाईतच दुचाकीने नाशिकहून ओझरला यायला निघाला. मात्र तपोवन डेपोजवळच त्याचाही अपघात झाला.

त्यास डोक्यास व हातापायास मार लागल्याने त्याल जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या मेंदूला दुखापत झाली आहे. दरम्यान, दोघींवर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी अभिषेकला नाशिकहून आणण्यात आले होते.

"महावितरणकडे वारंवार मागणी करूही लक्ष दिले जात नसल्याने मागेही रकिबे व काही नागरिकांचे बळी गेले आहेत. या भागात सदनिकांवरून अगदी हाताच्या अंतरावरून मुख्य वाहिनीवर संरक्षक पाइप लावा, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र अधिकाऱ्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे आज ही दुर्दैवी घटना घडून मायलेकीला प्राणाला मुकावे लागले. या तारा अजून किती बळी घेणार?"

- प्रदीप अहिरे, माजी सदस्य, पंचायत समिती सदस्य, निफाड

Death News
Jalgaon News: MSF जवान तोफेच्या तोंडी; वाळूच्या धंद्यात पोलिसांच्या भागीदारीमुळे जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com