MVP Election : आमदार कोकाटेंचे बंधू भारत कोकाटे सत्ताधारी गटात

MVP Election Latest Marathi News
MVP Election Latest Marathi Newsesakal

नाशिक : मविप्र निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्‍योपाच्‍या फैरी झाडल्‍या जात आहेत.

विरोधी गटात सहभागी झालेले आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे मात्र सत्ताधारी गटाच्‍या व्‍यासपीठावर बुधवारी (ता.१०) उपस्‍थितीत होते. संस्‍थेत राजकारण येऊ देऊ नका, अशी टीका करताना अप्रत्‍यक्षपणे त्‍यांनी बंधू आमदार कोकाटेवर निशाणा साधला. (MP Election MLA manikrao Kokate brother Bharath Kokate in ruling group nashik Latest Marathi Political News)

MVP Election Latest Marathi News
NMCच्या अधिकाऱ्यांना स्वदेशी यंत्रावर भरवसा नाय; Make in India भूमिकेला हरताळ

प्रगती पॅनल समर्थकांच्‍या मेळाव्‍यात भारत कोकाटे व्‍यासपीठावर उपस्‍थित होते. मराठा विद्या प्रसारक संस्‍था हे विद्येचे माहेरघर आहे. त्‍यामुळे संस्‍थेच्‍या कामकाजात राजकारण येऊ देऊ नका, असे आवाहन त्‍यांनी सभासदांना केले. या माध्यमातून त्‍यांनी स्‍वतःचे बंधू आमदार कोकाटे यांच्‍यावर निशाणा साधला आहे. बंधुंमधील या वादाचा आगामी निवडणुकीत कुणाला फायदा होतो, अन्‌ कुणाला फटका बसतो, याकडे लक्ष लागून राहणार आहे.

MVP Election Latest Marathi News
विद्यार्थ्यांकडून प्राचीन वटवृक्षाला 25 फुटाची राखी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com