लहान मुलांबरोबर पालकांना ठेवण्याचे नियोजन; तिसऱ्या लाटेसाठी तयारी

महापालिकेने लहान मुलांसाठी २५ टक्के खाटा आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे
Coronavirus
CoronavirusGoogle


नाशिक : कोरोनाची संभाव्य तिसरी (Coronavirus Third Wave) लाट पहिल्या व दुसऱ्या लाटेपेक्षाही भयानक असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने लहान मुलांसाठी २५ टक्के खाटा आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लहान मुले आई-वडिलांशिवाय राहू शकत नसल्याने अशावेळी काय करावे, असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. त्यादृष्टीने रुग्णालयात दाखल लहान मुलांबरोबर त्यांचे आई किंवा वडील या दोघांपैकी एकाला राहण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू केले आहे. (municipality plans to keep parents with young children in the hospital)



नाशिककर सध्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. दुसऱ्या लाटेने अनेकांना मृत्यूच्या कवेत घेतले, तर दोन लाखांहून अधिक रुग्णसंख्या पोचली आहे. दुसऱ्या लाटेचा सामना करत असतानाच राज्य शासनाने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. पहिला लाटेत ६० वर्षांपेक्षा अधिक, तर दुसऱ्या लाटेने २० ते ५० वयोगटातील नागरिकांना घेरले आहे. आता तिसरी लाट लहान मुलांना अधिक बाधक ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने महापालिकेकडून बिटको रुग्णालयात १०० बेडचे रुग्णालय सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शहरातील बालरोगतज्ज्ञ त्यांच्याकडे असणाऱ्या रुग्णालयांमध्ये एकूण बेड संख्येच्या २५ टक्के बेड कोरोनाबाधित बालरुग्णांसाठी आरक्षण ठेवण्याच्या सूचना आहेत. रुग्णसंख्या वाढल्यास टप्प्याटप्प्याने त्या बेडच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे.

Coronavirus
VIDEO : भाजप नगरसेविकेच्या पतीने रुग्णालयात घुसविली कार; नाशिकमधील संतापजनक प्रकार


लहान मुले सांभाळण्याची अडचण

मोठ्या व्यक्तींना आयसीयूमध्ये दाखल केले असता त्यांना नर्स किंवा डॉक्टर सांभाळू शकतात. मात्र लहान मुलांच्या बाबतीत अडचण निर्माण होते. लहान मुलांना आयसीयूमध्ये आई किंवा वडिलांशिवाय ठेवता येणार नाही. मुले आयसीयूमध्ये राहू शकत नाही. यामुळे लहान मुलांसाठी खाटा आरक्षित करताना पालकांनादेखील समावून घेण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू आहे. बीपी एक्झिट घालून किंवा लहान मुलांच्या रूमशेजारीच पालकांची व्यवस्था करता येईल का, असे नियोजन डॉक्टरांकडून सुरू आहे.

Coronavirus
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू करा; पालकमंत्र्यांना विनंती

रुग्णालयामध्ये बालकांसाठी २५ टक्के खाटा आरक्षित ठेवण्याचा निर्णय चांगला आहे. मात्र लहान मुले आई-वडिलांशिवाय राहू शकत नाही. अशा वेळी त्यांचीदेखील व्यवस्था करणे गरजेचे आहे.
- जगदीश पाटील, भाजप गटनेते
(municipality plans to keep parents with young children in the hospital)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com