NAMCO Bank Election: नामको बॅंकेसाठी आज मतदान; 19 जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात

NAMCO Bank Election Voting today nashik news
NAMCO Bank Election Voting today nashik newsesakal

NAMCO Bank Election : नाशिक मर्चंट्‌स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत १९ जागांसाठी रविवारी (ता. २४) मतदान होणार आहे. एकूण २६ उमेदवार रिंगणात असून, मतदान झाल्यावर सोमवारी (ता. २५) सकाळी मतमोजणी होऊन बॅंकेचा फैसला होईल.

जिल्ह्यासह परराज्यांत कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक मर्चंट्‌स को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत इच्छुकांनी अर्ज दाखल करीत भाऊगर्दी केल्याने निवडणूक रंगतदार होणार, अशी अपेक्षा होती. मात्र, माघारीच्या अंतिम दिवशी विरोधी सहकार पॅनलच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने सत्ताधाऱ्यांसाठी निवडणूक एकतर्फी झाली. ( NAMCO Bank Election Voting today nashik news)

शिवाय, प्रगती पॅनलच्या महिला राखीव गटातील सपना आनंद बागमार व शीतल सूरज भट्टड यांची बिनविरोध निवड झाली. दोन्ही महिला बिनविरोध झाल्या. असे असले, तरी रिंगणातील सहा अपक्षांमुळे निवडणूक रंगतदार झाली. फारसे आरोप-प्रत्यारोप झाले नसले, तरी अंतिम टप्प्यात अपक्षांच्या आरोपांनी ही निवडणूक चांगलीच गाजली.

प्रशासकीय तयारी पूर्ण

बँकेचे एक लाख ८८ हजार ६३८ मतदार आहेत. रविवारी होणाऱ्या मतदानाची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, अडीच हजार कर्मचारी नियुक्त केले आहेत. निवडणुकीसाठी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळात मतदान होईल.

निवडणुकीसाठी ३२४ मतदान केंद्रे असून, नाशिक शहरात १५५ मतदान केंद्रांवर ९० हजार ९१६ मतदार हक्क बजावतील; तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १४४ मतदान केंद्रांवर ८२ हजार ८९३ मतदार मतदान करतील.

NAMCO Bank Election Voting today nashik news
NAMCO Bank Election : ‘नामको’ बॅंक निवडणूक; भवर पुरावे सादर करू शकले नाही

जिल्ह्याबाहेर मुंबई, पुणे, चाकण, छत्रपती संभाजीनगर, जालना, वैजापूर, जळगाव, धुळे, दोंडाईचा, नंदुरबार, अहमदनगर, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर या २० मतदान केंद्रांवर १३ हजार ७८७ मतदार मतदान करतील. राज्याबाहेर सुरत व हैदराबाद येथे प्रत्येकी एक आणि दोन मतदान केंद्रे कार्यरत आहेत.

उद्या मतमोजणी

रविवारी मतदान झाल्यावर सोमवारी सकाळी आठला श्री छत्रपती संभाजी महाराज स्टेडियममध्ये मतमोजणीस सुरवात होईल. एकूण १०८ टेबलांवर ही मतमोजणी होणार आहे. मतदान आणि मतमोजणींचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येईल.

प्रगती पॅनलचे उमेदवार

सर्वसाधारण गट (१८ जागा) ः वसंतराव गिते, सोहनलाल भंडारी, हेमंत धात्रक, विजय साने, अविनाश गोठी, नरेंद्र पवार, ललितकुमार मोदी, अशोक सोनजे, गणेश गिते, महेंद्र बुरड, सुभाष नहार, प्रफुल्ल संचेती, रंजन ठाकरे, हरीश लोढा, आकाश छाजेड, भानुदास चौधरी, प्रकाश दायमा, देवेंद्र पटेल.

अनुसूचित जाती-जमाती (१ जागा) ः प्रशांत दिवे.

रिंगणातील अपक्ष उमेदवार

संदीप भवर, अॅड. सुधाकर जाधव, संजय नेरकर, विजय बोरा, कपिलदेव शर्मा, महेंद्र गांगुर्डे.
अनुसूचित जाती-जमाती ः विलास जाधव.

NAMCO Bank Election Voting today nashik news
NAMCO Bank Election: शरद पवार गट राहिला बाजूला; राष्ट्रवादी वगळता सर्वपक्षीय उमेदवार रिंगणात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com