नारोशंकरचा घंटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

naroshankar

नारोशंकरचा घंटा

ओ माय गॉड

मेनरोड गाडगे महाराज चौकात दैनंदिन एक व्यावसायिक तरुण जोरजोरात ओरडत असतो. ‘ओ माय गॉड’ हे शब्द ऐकून खरेदीसाठी आलेल्यांचे लक्ष त्या व्यावसायिकाकडे केंद्रित होते. सोमवारी देखील असाच प्रकार घडला. काही महिला चौकातील एका दुकानात कपडे खरेदी करत होते.

अचानक त्यांच्या कानावर ‘ओ माय गॉड’ शब्द पडला. त्यांनी कपडे घेणे सोडून त्या व्यावसायिकाकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुकानातील सेल्समनने ताई त्याकडे लक्ष देऊ नका. ते रोजच झालय. तो पिशवी विक्रेता असून त्याची पिशवी विकण्याची अशा प्रकारची पद्धत आहे.

जोरात ओरडतो ओ माय गॉड आणि हळूच म्हणतो जुनी पिशवी फेकून द्या नवीन पिशवी घ्या. असे म्हणताच त्या महिला हसू लागल्या. आणि म्हणाल्या व्यवसाय करण्याची त्याची ही वेगळीच पद्धत आहे. परंतु यातून अनेकांचा काळजाचा ठोका ही चुकतो हेही तितकेच खरे, असे म्हणत पुन्हा त्या महिला कपडे खरेदीत व्यस्त झाल्या.

(Naroshankarachi Ghanta by SAKAL nashik news)

हेही वाचा: नारोशंकराची घंटा : एका टीक-मार्कमुळे गमावली संधी!

तो दशक्रिया आज नव्हे उद्या आहे....

धार्मिक महत्त्व मोठे असल्याने गंगाघाटावरील रामतीर्थ परिसरात दशक्रिया विधींसाठी बारमाही गर्दी असते. सकाळच्या सुमारास एकाचवेळी अनेक दशक्रिया विधी जागोजाग सुरू असतात. त्यामुळे येथील आपल्या परिचितांचा किंवा आप्ताचा दहावा शोधण्यात गर्दीमुळे मोठा वेळ खर्ची पडतो.

असेच नाशिकरोड भागातून आलेले एक ज्येष्ठ गृहस्थ त्यांच्या नात्यातील एकाच्या दशक्रिया विधीसाठी आलेअसता त्यांना तासभर थांबूनही ज्यांच्या विधीसाठी आलेले त्यांचे आप्त सापडेनात. त्यामुळे यागृहस्थांची चांगलीच चलबिचल सुरू होती.

शेवटी त्यांनी खिशातून जुन्या पद्धतीचा मोबाईल काढून मुलीला दशक्रिया विधी कोठे चालू आहे, ते ठिकाण सापडत नसल्याने फोन लावला. तेव्हा पलिकडून ‘बाबा तो दशक्रिया आज नाही तर उद्या आहे’, असे सांगण्यात आले. तेव्हा कपाळाला हात लावत संबंधित ज्येष्ठांने तेथून पाय काढता घेतला.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

हेही वाचा: नारोशंकराची घंटा : तुमच्‍या मित्रांना कॉल करून बोलवता का?

नाशिकचा ‘मफलर’ ब्रँड !

विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीनिमित्ताने चर्चा रंगली ती म्हणजे, नाशिकचा ब्रँड ‘मफलर’ची ! एका महाविद्यालयात मफलर गुंडाळलेला विद्यार्थी इकडून तिकडे फिरत होता. इतर विद्यार्थ्यांशी संवाद साधत होता.

त्या वेळी एकाने त्याला हटकले अन् नाशिकचा ब्रँड का? अशी विचारणा करताच विद्यार्थ्यांमध्ये हंशा पिकला. मग, मफलर कोण कोण वापरते यावर चर्चा रंगली. त्याचक्षणी मग त्या नेत्याचा अन् नाशिकचा काय संबंध? असा चर्चेत सहभागी असलेला विद्यार्थी उत्तरला.

अखेर सर्वानुमते नाशिकच्या ‘मफलर’ ब्रँडवर शिक्कामोर्तब झाले आणि विद्यार्थी आपापल्या कामासाठी निघून गेले.

हेही वाचा: नारोशंकराचा घंटा : नाट्यप्रेमींचा चळका...!