Nashik 11th Admission : अकरावी प्रवेशासाठी आज दुसरी विशेष फेरी; जाणून घ्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक

11th Admission
11th Admissionesakal

Nashik 11th Admission : येथील नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी आणखी एक संधी उपलब्‍ध झालेली आहे. शिक्षण विभागाने दुसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. (nashik 11th admission Second special round today news )

आत्तापर्यंत प्रवेश न मिळालेल्‍या विद्यार्थ्यांना बुधवार (ता.२) पर्यंत नोंदणी करून या फेरीत सहभागी होता येईल. गुणवत्ता यादी शुक्रवारी (ता.४) जाहीर केली जाईल.

ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आत्तापर्यंत १६ हजार १३१ विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले असून, यानंतरही ११ हजार १०९ जागा रिक्‍त आहेत. अकरावी प्रवेशासाठी २५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असताना, अद्यापही अनेक विद्यार्थी प्रवेशाच्‍या प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

11th Admission
Career Selection : पालकांनो मुलांनाच ठरवू द्या भविष्याची दिशा; अन्यथा होईल दुर्दशा...!

या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्‍ध करून देण्याच्‍या उद्देशाने दुसरी विशेष फेरी राबविली जाते आहे. या प्रवेश फेरीचे वेळापत्रक शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले आहे. केवळ नोंदणी केलेल्‍या व यापूर्वी अर्जाचा भाग दोन भरलेल्‍या विद्यार्थ्यांना या फेरीत सहभागासाठी पुन्‍हा प्राधान्‍यक्रम नोंदवून अर्जाचा भाग २ लॉक करायचा आहे.

असे आहे प्रवेश फेरीचे वेळापत्रक-

* सहभागासाठी मुदत ः २ ऑगस्‍टपर्यंत

* गुणवत्ता यादी प्रसिद्धी ः ४ ऑगस्‍ट

* प्रवेशाची मुदत ः------४ व ५ ऑगस्‍ट.

11th Admission
Career Selection : असे निवडा करिअर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com