Saptashrungi Devi Temple : सप्तशृंगी गडावर देणगीदार भाविकाने अर्पण केली 21 किलो चांदीची मूर्ती

Saptashrungi Devi : अॅड. दीपक पाटोदकर यांच्या मित्र परिवाराने २१ किलो चांदीची मूर्ती व साडेसात किलो वजनाचे चांदीचे घंगाळ अर्पण केले.
Donor representative while offering 21 kg silver idol, silver bangle offered at Trust office. Confident with.
Donor representative while offering 21 kg silver idol, silver bangle offered at Trust office. Confident with.esakal

Saptashrungi Devi Temple : आद्य स्वयंभू शक्तिपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील आदिमायेच्या भाविकांकडून देणगी, भेट वस्तू, मूर्ती व अलंकार देण्याचा ओघ सुरु असून बुधवारी (ता.१७) सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त अॅड. दीपक पाटोदकर यांच्या मित्र परिवाराने २१ किलो चांदीची मूर्ती व साडेसात किलो वजनाचे चांदीचे घंगाळ अर्पण केले. ()

दीड वर्षांपूर्वी मायेच्या मूर्तीसंवर्धन कार्यानंतर आदिमायेच्या सुमारे अठराशे किलो शेंदूर असलेल्या शेंदूर लेपनाचे कवच काढल्यानंतर आदिमायेचे स्वयंभू मूळरुप प्रकट झाले आहे. त्यानंतर वणी गडाचे अर्धे पीठ नाही तर आद्य स्वयंभू पूर्णपीठ म्हणून ओळखू होऊ लागली आहे. वणी गडावर भाविकांचा दिवसेंदिवस ओघ वाढत असून वर्षभरात लाखो भाविक श्री भगवती चरणी नतमस्तक होत आहेत.

जागृत व नवसाला पावणारी अशी प्रचिती भाविकांमध्ये असून श्री भगवतीस विविध वस्तू, अलंकार, दागिने अशा विविध वस्तू व सेवा भाविक अर्पण करतात. अनेक भाविक फूल ना फुलाची पाकळी देण्यासाठी सढळ हाताने देणगी देण्यासाठी पुढे येतात. मंगळवारी (ता.१६) डोंबिवली येथील भाविकाने मृत्युपूर्वी लिहून ठेवलेल्या इच्छापत्रानुसार त्यांच्या कुटुंबीयांनी २१ ताळे वजनाचे सोन्याचे अलंकार विश्वस्त भूषणराज तळेकर यांच्या समन्वयातून अर्पण केले. (latest marathi news)

Donor representative while offering 21 kg silver idol, silver bangle offered at Trust office. Confident with.
Saptashrungi Devi Gad: दसऱ्यास शतचंडी यागास पूर्णाहुतीने सांगता; मोजक्याच मानकरींच्या उपस्थितीत बोकडबळी

बुधवारी (ता.१७) विश्वस्त ॲड. पाटोदकर यांच्या समन्वयातून पाटोदकर मित्र मंडळाने श्री रामनवमी व चैत्रोत्सवाचे औचित्य साधत २१ किलो वजनाची चांदीची श्री सप्तशृंगीची मूर्ती व साडे सात किलो वजनाचे चांदीचे घंगाळ अर्पण करत अजूनही आवश्यक वस्तू अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली.

ट्रस्टच्या कार्यालयात प्रमुख जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीचंद डी. जगमलानी, न्यासाचे अध्यक्ष तथा श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बाळासाहेब व्ही. वाघ यांनी देणगीदार भाविक व समन्वयक विश्वस्तांचा सत्कार केला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त ॲड. पाटोदकर, तळेकर, ॲड. ललित निकम, मनज्योत पाटील, डॉ. प्रशांत देवरे, मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, सहा. व्यवस्थापक भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्तोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी, संदीप बेनके आदी उपस्थित होते.

Donor representative while offering 21 kg silver idol, silver bangle offered at Trust office. Confident with.
Saptashrungi Devi Temple: सप्तशृंगगडावरील रोपवे उद्यापासून 2 दिवस बंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com