Nashik News : पैठणला जाणाऱ्या दिंडीचे अव्याहत 50 वर्ष; पारेगावच्या खिल्लारे कुटुंबीयांनी जपली परंपरा

Nashik : ‘दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला, घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला’, हीच थोरवी सांगणाऱ्या पारेगाव ते पैठण पायी दिंडीचे यंदा तब्बल ५० वे वर्ष आहे.
Dindi from Paregaon to Paithan.
Dindi from Paregaon to Paithan.esakal

Nashik News : ‘दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला, घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला’, हीच थोरवी सांगणाऱ्या पारेगाव ते पैठण पायी दिंडीचे यंदा तब्बल ५० वे वर्ष आहे. ही दिंडीची परंपरा येथील ग्रामस्थांनी जपली आहे. पैठण (जि. छत्रपती संभागीनगर) येथे संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्टी सोहळ्यानिमित्त गेल्या ५० वर्षांपासून (वै.) विठ्ठलतात्या खिल्लारे यांनी सुरु केलेल्या पारेगाव ते पैठण दिंडी नियमितपणे सुरू आहे. (nashik 50 years of Dindi going to Paithan of paregaon marathi news)

(वै.) विठ्ठलतात्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र जनार्धन खिल्लारे सात वर्षांपासून दिंडीचे नेतृत्व करीत आहेत. पारेगाव येथून दिंडीचे प्रस्थान झाले असून, कोटमगाव, गवंडगाव, वैजापूर, महालगाव, गंगापूर, ढोरेगाव, इसारवाडी आदी गावांच्या मार्गाने एकूण १५० किलोमीटर पायी चालत दिंडी जाणार आहे. उन्हाची तमा न बाळगता, नाथांचा जयघोष आणि टाळ मृदंगाच्या तालावर ठेका घेत, आठ दिवसांचा मुक्काम करत दिंडी नाथषष्ठीच्या दिवशी पैठणला पोचणार आहे. (latest marathi news)

Dindi from Paregaon to Paithan.
Nashik News : शहरात प्लॅस्टिक विक्रेत्यांवर छापे; दिडशेपैकी 11 जागांवर प्लॅस्टिक विक्री

दिंडीत शेकडो भाविक सहभागी झाले आहेत. यात वृद्धांची संख्या लक्षणीय आहे. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तनाची मेजवानी भाविकांना मिळणार आहे. यात तात्यामहाराज भुईगव्हाणकर, भाऊसाहेब महाराज आहेर, रेखाताई काकड, तुकाराम महाराज, निवृत्तीनाथ महाराज चव्हाण, गुरुदेव महाराज, बापू महाराज पोटे, रंगनाथ बाबा महालखेडेकर यांची कीर्तने होणार आहेत.

ग्रामस्थांसह वारकऱ्यांच्या सहकार्याने व खिल्लारे कुटुंबीयांच्या पुढाकारातून दिंडी अव्ययातपणे सुरू आहे. आता तिसरी पिढीही दिंडीची साक्षीदार होत आहे. दिंडी मुक्कामी असलेल्या ठिकाणी व दिंडी मार्गावर नाश्ता व जेवणाची सोय स्थानिक गावकरी करतात. ही सेवा ४९ वर्षांपासून अखंडित सुरू आहे. यापुढेही अशीच सुरू राहील, अशी माहिती दिंडीचे व्यवस्थापक बापू महाराज पोटे, केशव ढगे, दौलत सुरासे यांनी दिली.

Dindi from Paregaon to Paithan.
Nashik News : ‘ओल्ड स्कूल’ सायकलवर 100 किलोमीटरची स्वारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com