Nashik Accident News : किर्तांगळीच्या दोन्ही शाळकरी मुलांचा अपघाती मृत्यू; डीजे गाडी अन मोटारसायकल यांच्यात झाला होता अपघात

Accident News : डीजे वाहन व मोटारसायकल अपघातातील गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या शाळकरी मुलाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे
Accident News
Accident Newsesakal

वडांगळी : एकलहरे (ता.सिन्नर ) येथील शिवारात शेतमळ्यातील वस्तीवर पाण्याचा जार घेऊन जात असताना डीजे वाहन व मोटारसायकल अपघातातील गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या शाळकरी मुलाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. (Nashik Accidental death of two school children of Kirtangali news)

किर्तांगळीच्या दोन्ही शाळकरी मुलांचे अपघाती मृत्यू होण्याची पहिली घटना घडली आहे. मंगळवारी (ता.16) रात्री साडे आठच्या सुमारास हा अपघात झाला होता. एकलहरेला अखंड हरिनाम सप्ताहाला या दिवशी सुरूवात झाली. पिण्याच्या पाण्याचा जार किर्तांगळी गावातून घेऊन आगणमळा भागात शेती वस्तीकडे शाळकरी मुले मोटारसायकल वरून जात होती.

त्यावेळी डी जे गाडी व मोटारसायकल यांच्यात अपघात झाला. त्यात पार्थ सोमनाथ चव्हाणके (वय 14 )याचा घटना स्थळी मृत्यु झाला होता. दुसरा अति गंभीर अभय नामदेव चव्हाणके (वय 14 )ला उपचारासाठी पाठविण्यात आले. नाशिकला उपचार सुरू असताना अभयचे आज निधन झाले आहे. (latest marathi news)

Accident News
Jalgaon Fire Accident : पिंपळगाव पिंप्री येथे भीषण आगीत 6 घरे खाक; होत्याचे नव्हते झाले

दोन्ही शाळकरी मुले वडांगळीच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आठवीत शिकत होते. शेतकरी नामदेव चव्हाणके यांचा एकूलता मुलगा आहे. अपघातात दोन्ही शेतकरी कुटुंबातील कष्टाळू मुलांचा मृत्यू झाला आहे. किर्तांगळीला दुपारी तीन वाजेला अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

Accident News
Goa Accident News : गोवा बॉर्डर वर कार कंटेनरची धडक, एकाचा मृत्य, ९ जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com