Nashik News : 3 महिन्यानंतरही गारपीटग्रस्त मदतीपासून वंचित! कसबे सुकेणे परिसरातील शेतकरी मदतीसाठी आग्रही

Nashik News : काही शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती शासनापर्यंत पोहोचली असली, तरी उर्वरित शेतकऱ्यांमुळे इतर लाभधारक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.
Tensed Farmer
Tensed Farmeresakal

कसबे सुकेणे : कसबे सुकेणे व मौजे सुकेणे पंचक्रोशीत २६ नोव्हेंबर २०२३ ला झालेल्या गारपीटीनंतर केंद्रीय व राज्यातील अनेक मंत्र्यांनी गारपीटग्रस्त परिसराची पाहणी करत तातडीने शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, अशी घोषणा केली. मात्र, तब्बल तीन साडेतीन महिने उलटूनही येथील गारपीटग्रस्त शेतकरी अद्याप शासकीय मदतीपासून वंचित आहेत.

अधिकाऱ्यांनी पीकनिहाय पंचनामे करून शासनाला तातडीने अहवाल पाठविला आहे. काही शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती शासनापर्यंत पोहोचली असली, तरी उर्वरित शेतकऱ्यांमुळे इतर लाभधारक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. तातडीने आम्हाला मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. (Nashik after 3 months hailstorm victims deprived of help marathi news)

मौजे सुकेणे गावात जवळपास ७५० ते ८०० हेक्टर क्षेत्र गारपिटीने बाधित झाले. जवळपास ४५८ शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे पोहोचवण्यात आली. उर्वरित ९० शेतकऱ्यांचे आधार, बँक, थंब या अडचणीमुळे त्यांची माहिती पोहोचवण्यात अडचणी येत आहेत.

कसबे सुकेणे गावात जवळपास २५०० हेक्टर क्षेत्र बाधित असून, २२०० शेतकऱ्यांना गारपिटीचा फटका बसला. द्राक्ष, ऊस, गहू, हरभरा, कांदा व इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने द्राक्ष पिकासाठी हेक्टरी ३६ हजार रुपये, तर गहू, ऊस, हरभरा या पिकांसाठी हेक्‍टरी २७ हजार रुपये मदत जाहीर केली असली, तरी ती मदत मिळालेली नाही. (Latest Marathi News)

Tensed Farmer
लवकरच रेल्वे देणार गुडन्यूज; मुंबईसह या मार्गांना मिळणार दिलासा; १२ लाख कोटींची योजना

उलट गारपीटीनंतर शेतकरी कर्जबाजारी झाले. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असताना, शासन केवळ हजारात मदत देत असले, तरी ती मदतही अद्याप पदरात पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे कागदपत्र, आधार, शेतीचा उतारा, बँकेची अडचण बाकी आहे, ते शेतकरी सोडून उर्वरित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

"कसबे सुकेणे व परिसरातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असतानाही बँका कोणत्याही प्रकारचे सहकार्य करायला तयार नाही. कर्ज वाढतच चालले आहे. तुटपुंजी शासकीय मदत मिळणे अपेक्षित असताना, ती मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा शासनावर मोठा रोष आहे."-विश्वास भंडारे, द्राक्ष बागायतदार शेतकरी, कसबे सुकेणे

Tensed Farmer
Nashik News : सिन्नर- निफाड रस्त्यावर वाहतूक कोंडी! भाजीपाला विक्रेत्यांनी थाटली दुकाने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com