Nashik News : स्वातंत्र्य अन् प्रेमाचा तरल नाट्याविष्कार ‘अमृता साहिर इमरोज’; 17 मार्चला मेजवानी

Nashik : प्रसिद्ध पंजाबी लेखिका अमृता प्रीतम यांच्या जीवनावर आधारित या नाट्यकृतीचा खास महिलांसाठी विशेष प्रयोग ‘सकाळ’ तर्फे १७ एप्रिलला महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित करण्यात आला आहे.
An episode from the play 'Amrita Sahir
An episode from the play 'Amrita Sahir esakal

Nashik News : स्वातंत्र्य अन् प्रेमाचा शोध घेणारा तरल नाट्याविष्कार म्हणजे ‘अमृता साहिर इमरोज’. प्रसिद्ध पंजाबी लेखिका अमृता प्रीतम यांच्या जीवनावर आधारित या नाट्यकृतीचा खास महिलांसाठी विशेष प्रयोग ‘सकाळ’ तर्फे १७ एप्रिलला महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित करण्यात आला आहे. शंभु पाटील लिखित व मंजूषा भिडे दिग्दर्शित या नाट्यविष्काराची निर्मिती जळगावच्या परिवर्तन संस्थेने केली आहे.

या नाट्य प्रयोगातून उदात्त प्रेमाची कथा रसिकांना निखळ आनंदाची अनुभूती देणार आहे. समकालीन काळात अमृता प्रीतम यांचे जीवन व साहित्य याच महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. अमृता प्रीतम यांच्या जीवन व साहित्यामधून केवळ इतिहासच उलगडत नाही, तर अनेक गुंतागुंतीचे प्रश्न, प्रेम व नातेसंबंध, आपल्या जगण्याची मूलभूत प्रेरणा, समकाळाला उलगडलेला इतिहास, आपल्याला जखडून टाकणारी सामाजिक भावना, यामध्ये व्यक्तीची होणारी कुचंबणा अशा अनेक स्तरावर हे नाटक प्रवास करत.

आजच्या कमालीच्या द्वेषाच्या काळात अमृताच्या विचारांची साक्ष काढणे खूप गरजेचे आहे. या जगातील माणसं अन् प्रेम यातून एक तरल अनुभव देणारे हे नाटक अंतर्मनात घर करणारी कलाकृती आहे. सोनाली पाटील, हर्षदा कोल्हटकर, शंभु पाटील या कलावंतांनी नाटकात भूमिका साकारल्या आहेत. रंगभूमीवरील मान्यवर कलावंत, साहित्य क्षेत्रातील दिग्गज तसेच ही नाटक याची देही याची डोळा पाहणाऱ्या प्रत्येक रसिक प्रेक्षकाला प्रभावित करणार आहे. प्रत्येकाने अनुभवायला हवी अशी नाट्यकृती आहे. (latest marathi news)

An episode from the play 'Amrita Sahir
Nashik News : मोगरे येथे उन्हाळी नागली व वरईचा प्रयोग; बियाणे वाढविण्यासाठी सेंद्रिय नागलीचे अंतरपीक

'‘अमृता साहिर इमरोज’ म्हणजे सशक्त नाटकाचा अनुभव आहे. असे नाट्य प्रयोग रंगभूमीला पुढे नेणारे आहेत.''- भालचंद्र नेमाडे, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक.

''हे नाटक पाहताना सलग ९५ मिनीट मी एका वेगळ्या विश्वात होतो. जगभरातील अनेक गोष्टी बघितल्या आहेत. तरी हे नाटक बघून मी थक्क आहे. केवळ अप्रतिम!''- अच्युत गोडबोले, ज्येष्ठ साहित्यिक व संगणक तज्ज्ञ.

''आजच्या काळात प्रेमाविषयी असे बोलता येत, हे कदाचित भाबडेपण आहे असं वाटू शकेल. मात्र वास्तववादाचा आधार घेत प्रेमाचे यथार्थ दर्शन आपल्याला चकित करतेच, पण हे नाटक आपल्या सोबत घरी येते.''- किशोर कदम (सौमित्र), अभिनेता व कवी.

‘सकाळ’तर्फे ‘अमृता साहिर इमरोज’ या नाट्यविष्काराचा खास महिलांसाठी स्पेशल शो आयोजित करण्यात आला आहे. तरी अधिकाधिक महिलांनी व नाट्यरसिकांनी ही नाट्यकृती अनुभवावी.

नाट्य प्रयोगाची तारीख : १७ एप्रिल

स्थळ : महाकवी कालिदास कलामंदिर

वेळ : सायंकाळी ५.३० वा.

An episode from the play 'Amrita Sahir
Nashik News : जिल्ह्यात सोमवारपासून ‘जलसमृद्ध नाशिक’ अभियान; 100 कोटी लिटर क्षमता वाढविण्याचा निर्धार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com