Nashik Power Cut : सिडकोत अघोषित भारनियमन! नागरिक त्रस्त; 6 तास वीजपुरवठा खंडित

Nashik News : सिडको विविध भागांत सकाळ, दुपार, सायंकाळ केव्हाही अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्याचा प्रकार सुरू आहे.
Power Cut
Power Cutesakal

सिडको : सिडको विविध भागांत सकाळ, दुपार, सायंकाळ केव्हाही अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्याचा प्रकार सुरू आहे. एकीकडे तापमानाच्या पारा उंचावत असल्याने सर्वत्र उकाडा जाणवू लागला असून, नागरिक अक्षरश घामाघूम झाले आहेत.

यातच सिडको महावितरण हद्दीत रोज, तसेच दिवसाआड केव्हाही वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरू आहे. तीन, चार, तसेच सहा-सहा तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने जणू काही अघोषित भारनियमन महावितरण कंपनीकडून करण्यात आले की काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. (Nashik cidco unannounced load shedding news)

तोरणानगर, उदय कॉलनी, महाले फार्म, राणा प्रताप चौक, पवननगर, उत्तमनगर, उपेंद्रनगर, सावतानगर, त्रिमूर्ती चौक, पाटीलनगर सह विविध भागांत नियमित वीजपुरवठा खंडित होत आहे. गुरुवारी (ता. २६) सकाळी सातपासून दुपारी तब्बल तीन वाजले तरीही वीजपुरवठा खंडित होतो.

अचानक सहा-सात तास वीजपुरवठा खंडित झाल्याने उन्हाच्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उकाड्यापासून बचावासाठी घराघरांमध्ये पंखा व कूलरचा वापर होतो. मात्र, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होऊ लागली आहे. (Latest Marathi News)

Power Cut
Nashik News : मतदान करणाऱ्यांना खरेदीवर 5 ते 10 टक्के सूट! कापड व्यापारी संघटनेतर्फे निर्णय

खंडित विजेमुळे व्यावसायिकांनी सकाळनंतर दुकाने बंद ठेवली होती. महावितरण कंपनीच्या या गोंधळामुळे सिडकोसह शहराला ऐन उन्हाळ्यात उकाड्याला सामोरे जावे लागले. प्रश्न उकाड्याचाच नाही, तर विजेशी संबंधित किती तरी अत्यावश्यक सेवा आहेत, त्या सर्व ठप्प झाल्या. वीजबिल भरले नाही तर तातडीने वीज खंडित केली जाते. मात्र, महावितरण जेव्हा दिवसाआड वीज खंडित करीत असेल तर नागरिकांचा संताप होणे स्वाभाविक आहे.

"दिवसाआड अशी परिस्थिती उद्भवत असेल तर ते गंभीर आहे. महावितरणने वेळीच या प्रकाराची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा."- स्वाती चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या

Power Cut
Nashik Unseasonal Rain News : अवकाळी पावसाची शहरात हजेरी; पार्यात किरकोळ घसरण

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com