नाशिक : घटस्थापनेपासून ग्रामीण भागातही सुरु होणार बससेवा

Nashik city bus service
Nashik city bus serviceesakal

नाशिक : राज्य शासनाने कोरोना निर्बंध शिथिल करताना शाळा, महाविद्यालये, तसेच धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी दिल्याने शहर बससेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. घटस्थापनेच्या दिवसापासून ४४ नवीन बस रस्त्यावर उतरविताना सिन्नर, त्र्यंबकेश्‍वर, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी या ग्रामीण भागातूनदेखील बससेवा सुरू केली जाईल, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.


जुलै महिन्यात सुरू झालेल्या शहर बस वाहतुकीच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाची दुसरी वार्षिक सभा कंपनीचे अध्यक्ष आयुक्त कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.२९) पार पडली. महापौर सतीश कुलकर्णी, कंपनीचे संचालक उपमहापौर भिकूबाई बागूल, स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृह नेते कमलेश बोडके, भाजप गटनेते अरुण पवार, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, समन्वयक व अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, सिटीलिंकचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड, स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी आदी उपस्थित होते.


बैठकीनंतर महापौर कुलकर्णी यांनी माहिती दिली. पाच टप्प्यात बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दोन टप्प्यात बावीस मार्गांवर ८१ बस सुरू करण्यात आल्या होत्या, परंतु शाळा, महाविद्यालये, तसेच धार्मिक स्थळे बंद असल्याने प्रवासी मिळण्यात अडचण होती. आता राज्य शासनाने चार ऑक्टोबरपासून शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसची आवश्‍यकता असल्याने तिसऱ्या टप्प्यांत बसची संख्या व फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. बारा नवीन मार्गांवर बससेवा सुरू केली जाणार आहे. दोन मार्गांवर चक्री बससेवा सुरू केली जाणार आहे. ४४ नवीन बस ताफ्यात दाखल होतील. एकाच वेळी ४४ बस रस्त्यावर न धावता टप्प्याटप्प्याने म्हणजे आठ दिवसांनी दहा बस रस्त्यावर उतरविल्या जाणार आहेत.

Nashik city bus service
इगतपुरी तालुक्यात १०९ मिमी पाऊस; सर्वत्र धुक्याचे साम्राज्य


सोमवारपासून सिन्नर, त्र्यंबकेश्वरला बससेवा

सोमवारी (ता. ४) पासून सिन्नर, त्र्यंबकेश्वर येथे बससेवा सुरू केली जाईल. त्यानंतर टप्प्याटप्याने पिंपळगाव बसवंत, दिंडोरी बससेवा पुढील पंधरा दिवसात सुरू केली जाणार असल्याचे सिटीलिंकचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी सांगितले. दरम्यान, कंपनीच्या अतिरिक्त संचालकपदी सभागृहनेते कमलेश बोडके, भाजप गटनेते अरुण पवार, स्मार्ट कंपनीचे सीईओ सुमंत मोरे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली.



शहर बससेवेची सद्यःस्थिती

- सध्या बावीस मार्गांवर ८१ बस सुरू.
- तिसऱ्या टप्प्यात ४४ बस वाढून १२५ होणार.
- १२ नवीन मार्गांचा समावेश, दोन मार्गावर चक्री सेवा.
- दररोज १५, ८०० किलोमीटरचा बसचा प्रवास.
- दररोज चोवीस हजार प्रवाशांना सेवेचा लाभ.
- ८० दिवसात १२ लाख १६ हजार ५५ प्रवाशांचा प्रवास.
- बससेवेतून दोन कोटी ५७ लाख रुपये उत्पन्न.

Nashik city bus service
MPSC परीक्षेत रोहन कुवर मागासवर्गीयांमध्ये राज्यात प्रथम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com