esakal | इगतपुरीत तालुक्यात १०९ मिमी पाऊस; सर्वत्र धुक्याचे साम्राज्य | Nashik Rain
sakal

बोलून बातमी शोधा

nashik rain update igatpuri taluka has received 109 mm of rain in a single day

इगतपुरी तालुक्यात १०९ मिमी पाऊस; सर्वत्र धुक्याचे साम्राज्य

sakal_logo
By
विजय पगारे

इगतपुरी (जि. नाशिक) : इगतपुरी शहरासह, तालुक्यात आणि कसारा घाट परिसरात सलग दोन दिवसापासून संततधार सुरू आहे. सकाळपासून पुन्हा सुरू झालेल्या संततधारेने त्यामुळे निसर्ग पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. इगतपुरीत आज एकाच दिवसात तब्बल १०९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. इगतपुरी घोटीसह तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.


तालुक्याच्या पश्चिम भागातील जास्त पावसाच्या भागातील त्रिंगलवाडी, बलायदुरी, आडवण, टाकेघोटी, बोरटेंभे, भावली मानवेढे, बोर्ली नांदगावसदो, पिंपरीसदो, तळेगाव, घोटी तसेच मध्य भागातील मुकणे, पाडळी देशमुख, गोंदे दुमाला, सांजेगाव वाडीवऱ्हे, मुंढेगाव, आहुर्ली, म्हसुर्ली, वैतरणा, नांदडगाव, आवळखेड, दौंडत, चिंचलेखैरे, देवळे, खैरगाव, खंबाळे व पूर्व भागातही दमदार पाऊस सुरू आहे. पावसाने चौफेर फटकेबाजी करीत वातावरण बदलून टाकले आहे. मध्येच पावसाच्या जोरदार सरी तर मध्येच धुके दाटत असल्याने यामुळे एका आल्हाददायक वातावरणाची अनुभूती येत आहे. या वातावरणाचा अनुभव आणि धुक्यात मिसळून जाण्यासाठी येथे पर्यटक दाखल होत आहेत.

त्र्यंबककडे पर्यटकांची रीघ

इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर येथेही सलग संततधार सुरू आहे. पावसाचे समाधानकारक आगमन झाल्याने मोठ्या संख्येने पर्यटकांचा ओघ वाढला आहे. तालुक्यातील निसर्ग पर्यटन अनुभवण्यासाठी धरण आणि धबधब्यांच्या जागी गर्दी वाढली आहे. पहिणे बारीतील सौंदर्य बहरल्याने त्र्यंबकला भेट देणाऱ्या पर्यटकांचा ओघ आता पहिणे बारीकडे वाढला आहे. निसर्ग पर्यटन अनुभवण्यासाठी पर्यटक येत असल्याने आदिवासी बांधवांना रोजगारही मिळाला आहे. पर्यटकांना मक्याचे कणीस, शेंगा, गावरान काकडी मेखा तसेच विविध रानभाज्यासह खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तूंची विक्री वाढली आहे.

हेही वाचा: MPSC परीक्षेत रोहन कुवर मागासवर्गीयांमध्ये राज्यात प्रथम


सहा मंडळातील पाऊस असा
इगतपुरी : १०९,
घोटी बुद्रुक : ४७,
वाडीव-हे : ३९,
नांदगाव बुद्रुक : ३१,
टाकेद : २२,
धारगाव : ११५

हेही वाचा: नाशिकमध्ये कोसळ'धार' सुरूच; नदीकाठच्या व्यावसायिकांत धाकधूक

loading image
go to top