Nashik Crime: वेगवेगळ्या घटनांमध्ये ओरबाडले 1 लाख 40 हजारांचे स्‍त्रीधन; महिला दिनाच्‍या पूर्वसंध्येला स्‍नॅचिंगच्‍या घटना

Crime News : या घटनांमुळे महिलांच्‍या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
Crime Chain Snatching
Crime Chain Snatchingesakal

नाशिक : जागतिक महिला दिनाच्‍या पूर्वसंध्येला शहरात वेगवेगळ्या भागात चेनस्‍नॅचिंगच्‍या दोन घटना घडल्‍या. या घटनांमध्ये एकूण १ लाख ४० हजार रुपये किमतीचे स्‍त्रीधन ओरबाडल्‍याचे दाखल झालेल्‍या फिर्यादीत म्‍हटले आहे. या घटनांमुळे महिलांच्‍या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. (Nashik Crime Snatching incidents on Womens Day marathi news)

पहिल्‍या घटनेत पंचवटीतील लामखेडे मळा, सहजानंद सोसायटी भागातून चोरट्यांनी महिलेच्‍या गळ्यातील सोन्‍याची पोत ओरबडली. गुरुवारी (ता.७) सायंकाळी सव्वा सातच्‍या सुमारास घडलेल्‍या या प्रकाराबाबत मंगला दिवटे यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काळ्या रंगाच्‍या स्‍पोर्टस्‌ बाईकवरुन आलेल्‍या दोघांनी ७० हजार रुपये किंमतीची सोन्‍याची पोत ओरबाडून नेल्‍याचे फिर्यादीत म्‍हटले आहे.

दुसऱ्या घटनेत याच दिवशी दुपारी अडीचच्‍या सुमारास सिडकोतील डीजीपीनगर २, महाकाली चौकातील फडोळ मळा, ओम कॉलनीच्‍या रस्‍त्‍याने चाललेल्‍या महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी ओरबाडले. या प्रकरणी माधुरी सतीश भामरे यांनी अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काळ्या रंगाच्‍या दुचाकीवरून आलेल्‍या दोघांनी ७० हजार रुपये किमतीचे सोन्‍याचे मंगळसूत्र ओरबडल्‍याचे फिर्यादीत म्‍हटले आहे. (Latest Marathi News)

Crime Chain Snatching
Nagpur Crime: मिनी बॉम्ब प्रकरणातील आरोपीचा जामीन रद्द; पोलिसांचे प्रयत्न झाले सफल, आरोपी अटकेत

दोन्‍ही घटनांचा परस्‍परांशी संबंध?

या दोन्‍ही घटना काही तासांच्‍या अंतराने घडल्‍या आहेत. दरम्‍यान फिर्यादीत संशयितांसंदर्भात दिलेल्‍या माहितीत काळ्या रंगाच्‍या दुचाकीचा उल्‍लेख आहे. त्‍यामुळे दोन्‍ही घटनांचा परस्‍परांशी संबंध आहे का? या दृष्टीकोनातूनही पोलिस तपास करत आहेत.

Crime Chain Snatching
Nashik Crime: चैन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीचा सिन्नर पोलिसांकडून पर्दाफाश! जबरी चोरीसह चोरीचे 4 गुन्हे उघडकीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com