Nashik Crime: देशी पिस्टलसह 2 जिवंत काडतुसे हस्तगत; गुन्हे शाखेच्या पथकाची सिन्नर शहरात कारवाई

Crime News : सिन्नर शहरातील हॉटेल शाहू परिसरात बेकायदेशीर रित्या देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या 26 वर्षीय तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.
Siezed Pistol
Siezed Pistolesakal

वावी : सिन्नर शहरातील हॉटेल शाहू परिसरात बेकायदेशीर रित्या देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या 26 वर्षीय तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेनिहाय कारवाया करण्यात येत आहेत. (Nashik Crime 2 cartridges seized with gavthi pistol Action of crime branch team in Sinnar city marathi news)

त्याअंतर्गत अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना सिन्नर शहरात अवैधरित्या घातक अग्निशस्त्र विक्री करणाऱ्या तरुणाबाबत माहिती समजली होती. त्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजीव सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने हॉटेल शाहू परिसरात सोमवारी सापळा रचला होता.

वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे गणेश लक्ष्मण हाके, वय २६, रा. गोजरे मळा, सिन्नर यास पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. सदर शस्त्र तो कोणाला विक्री करणार होता याबाबतची माहिती त्यांनी दिली नाही. (Latest Marathi News)

Siezed Pistol
Nashik MD Drugs Crime: एमडी गुन्ह्यातील फरार संशयिताला अटक; शहर गुन्हेशाखा युनिट एकची कामगिरी

त्याच्याविरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, हवालदार चेतन संवस्तरकर, प्रविण सानप, हेमंत गरूड, पोलीस शिपाई विनोद टिळे, गिरीष बागुल, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने ही कारवाई केली.

"आगामी कालावधीत अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे इसमांविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे . कोणीही अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच दहशत निर्माण करीत असेल, तर नजीकचे पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. आपल्या परिसरातील सुरू असलेल्या अवैध व्यवसाय बाबत सुजाण नागरिकांनी पोलीस हेल्पलाइनवर माहिती द्यावी."

- आदित्य मिरखेलकर (अपर पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण)

Siezed Pistol
Nashik Crime : सातपूर औद्योगिक वसाहतीत लिफ्ट कोसळून मजुराचा मृत्यू; ठेकेदारावर गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com