Nashik Crime : सोनसाखळी चोरट्याला 5 वर्षे सश्रम कारावास

Crime News : हिरावाडीमध्ये पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
Jailed
Jailedesakal

Nashik Crime : हिरावाडीमध्ये पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास (Rigorous Imprisonment) व १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

दंगल उर्फ उमेश अशोक पाटील (२८, रा. रत्नदीप रो-हाऊस, कदम मळा, जाचक मळा, जयभवानी रोड, नाशिकरोड) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदरची घटना २१ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडली होती. (Nashik Crime Chain thief sentenced marathi news)

शारदा वसंतलाल चुडासन (५५, रा. पार्वती अपार्टमेंट, हिरावाडी, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, त्या भाजीपाला घेऊन पायी घराकडे जात असताना आरोपी उमेश याने दुचाकीवरून येऊन त्यांच्या गळ्यातील २० हजाराची सोन्याची पोत खेचून नेली होती. याप्रकरणी पंचवटी पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. तत्कालीन उपनिरीक्षक एस.एस. भिसे यांनी गुन्ह्याचा तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

या खटल्याचे कामकाज अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती प्रतिभा पाटील यांच्यासमोर सुरू होते. सरकारपक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. श्रीमती सुनिता चितळकर यांनी कामकाज पाहताना साक्षीदार, पंच तपासले.

यात आरोपीविरोधातील दोष सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास व १० हजारांचा दंड ठोठावला आहे. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार एम.ए. खंबाईत, महिला अंमलदार पी.पी. गोसावी, विक्रांत नागरे यांनी पाठपुरावा केला. (Latest Marathi News)

Jailed
Nagpur Hit and Run: नागपुरात ‘हिट ॲन्ड रन’! मद्यधुंद महिलांनी दोन तरुणांना चिरडले, २४ तासांत जामीनही मंजूर

फिर्यादीला मदत

या गुन्ह्यात फिर्यादी श्रीमती शारदा चुडासन यांची सोन्याची पोत आरोपीने खेचली असता, त्यावेळी त्यांच्या गळ्याला जखमही झाली होती. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला ठोठावलेल्या दंडापैकी ९ हजार रुपये फिर्यादी महिलेला देण्याचेही आदेश दिले आहेत.

दरम्यान, आरोपी दंगल जाधव हा सराईत गुन्हेगार असून, ५६ गुन्हे दाखल आहेत. यातील काही गुन्ह्यांमध्ये त्यास शिक्षा तर काही खटल्यांचे कामकाज सुरू आहे.

Jailed
Nagpur Crime: बॅटरीच्या बॉक्समध्ये संदिग्ध पॅकेट आढळल्याने खळबळ, शेडमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेत सापडला लाखोंचा गांजा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com