Nashik Crime News : उत्तर प्रदेशातील अल्‍पवयीन मुलीची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका

Crime News : अपहरणकर्त्यांनी अल्‍पवयीन मुलीस उत्तर प्रदेश येथून पळवत नाशिकला आणल्‍याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला मिळाली होती
Crime News
Crime Newsesakal

नाशिक : उत्तर प्रदेश येथून अल्‍पवयीन मुलीचे अपहरण करून नाशिकला दाखल झालेल्‍या दोघांना पोलिसांनी ताब्‍यात घेत संशयितांच्‍या ताब्‍यातील अल्‍पवयीन मुलीची सोडवणूक केली आहे. (Nashik Crime Minor girl rescued from kidnappers in Uttar Pradesh)

Crime News
Mumbai Crime News: धक्कादायक! घरासाठी लागणार होते तब्बल 23 लाख; पैशासाठी 9 वर्षाच्या मुलाचं अपहरण करुन केली हत्या!

अपहरणकर्त्यांनी अल्‍पवयीन मुलीस उत्तर प्रदेश येथून पळवत नाशिकला आणल्‍याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला मिळाली होती. यानंतर पोलिसांनी शिताफितीने कारवाई करताना अपहृत मुलीची सुटका केली. दोघा संशयितांना पकडले. गोरख मिठ्ठु बिंद (वय २१) आणि अभिषेक गोपाल मौर्या (दोघे रा. जि. चंदौली, उत्तर प्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत.

उत्तर प्रदेशहून अल्‍पवयीन मुलीला अपहरण करून आणताना, हे तिघे अंबड परिसरातील दत्तनगर भागात वास्‍तव्‍य करत होते. गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय पगारे, सहायक उपनिरीक्षक विवेक पाठक, भारती देवकर, हवालदार प्रकाश महाजन, सुनील आहेर यांच्या पथकाने या प्रकरणी तपास करताना मुलीची सुटका केली. दोघा संशयितांना अंबड पोलिसांच्‍या स्‍वाधीन केले आहे. (latest marathi news)

Crime News
Pune Crime News : चाकण,महाळुंगे परिसरातली गुन्हेगारी धोकादायक ; गुन्हेगारीला चाप लावण्याची गरज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com