Nashik Crime News : उसने पैसे परत न केल्याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News : उसने पैसे परत न केल्याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

चांदोरी : उसने पैसे परत मागितले असता त्याचा राग आल्याने झालेल्या वादात एकास थेट ठार मारल्याचा प्रयत्न केल्याची घटना मांजरगाव (ता. निफाड) येथे घडली. याप्रकरणी सायखेडा पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध मारहाण तसेच जातिवाचक शिवीगाळ केल्याने ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ 'या' पक्षाची पुण्यात बॅनरबाजी

मांजरगाव येथील सोमनाथ उगले यांच्याकडून कैलास पवार यांनी पैसे उसने घेतले होते. ते परत करत नसल्याने ते मागण्यासाठी श्री. उगले गेले असता कैलास पवार यांच्यासोबत त्याचा वाद झाला. वादाचे रूपांतर झटापटीत झाले. यात सोमनाथ उगले खाली पडले असता त्यांच्या डोळ्याला जखम झाली. सदरची घटना उगले यांनी आपल्या नाशिक येथील गणेश व तुषार या दोघा मुलांना सांगितली. त्यानंतर त्यांच्या मुलांनी याबाबत कैलास पवार यांना जाब विचारण्यासाठी गोदानगर येथे गेले असता त्यांना श्याम पवार आणि कैलास पवार दुचाकीवर जाताना दिसताच त्यांनी आपल्या ताब्यातील चारचाकीने त्यांच्या दुचाकीस धडक दिली.

हेही वाचा: Astrology Tips : नाकाच्या आकारावरून ओळखा स्वभाव, जाणून घ्या काय सांगतं सामुद्रिकशास्त्र

त्यानंतर उगले बंधूनी कैलास यास जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्यानंतर कैलास यास गाडीत टाकून पुन्हा अज्ञात ठिकाणी नेत मारहाण करत कैलास विरुद्ध सायखेडा पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल केला. त्याचवेळी शाम पवार याने पोलिस ठाण्यात येत कैलास पवार याबद्दल विचारले असता सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.वाय.कादरी यांना प्रकरण वेगळे असल्याचे समजताच त्यांनी शाम याच्याकडे सविस्तर चौकशी केल्यावर त्यांना उगले बंधू खोटे बोलत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी कैलास यास उगले यांच्या गाडीतून बाहेर काढत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच शाम पवार याच्या तक्रारीवरून तुषार व गणेश उगले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा: Nashik News : कुत्र्याला पोळ्या दिल्या नागरिकांनी केली महिलांना मारहाण

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयित यांना ताब्यात घेतले आहे. सदरच तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार किरण ढेकळे, मोठाभाऊ जाधव, भारत पगारे, पवन निकम आणि श्री. तेलोरे करत आहे.

टॅग्स :NashikCrime News