Nashik News: महाआवास अभियान विशेष राज्य पुरस्कारात नाशिक जिल्ह्याची बाजी!

Nashik district won 5 awards in Mahaavas Abhiyan Special State Award news
Nashik district won 5 awards in Mahaavas Abhiyan Special State Award news

Nashik News : राज्य शासनाने २०२१-२२ मध्ये राबविलेल्या महाआवास अभियानात नाशिक जिल्ह्याने प्रधानमंत्री आवास व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत विविध संवर्गांत उत्कृष्ट कामगिरी करून तब्बल पाच पुरस्कार पटकविले.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य योजनेत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात सर्वाधिक गुणांक घेत नाशिकने राज्यात प्रथम पुरस्कार पटकावला. (Nashik district won 5 awards in Mahaavas Abhiyan Special State Award news)

तसेच शबरी आवास योजनेतही प्रथम पुरस्कार पटकावत जिल्ह्याने बाजी मारली. महाआवास योजनेंतर्गत प्रदान करण्यात आलेले हे पुरस्कार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी स्वीकारले.

केंद्र व राज्यपुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीमध्ये गतिमानता व गुणवत्ता आणण्यासाठी राज्यात ‘महाआवास अभियान २०२३-२४’ राबविण्यात येत आहे. अभियानाचा प्रारंभ गुरुवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाला.

या कार्यक्रमात ‘महाआवास अभियान २०२१-२२’ मध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना ‘महाआवास अभियान पुरस्कार’ व ‘महाआवास अभियान विशेष पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

Nashik district won 5 awards in Mahaavas Abhiyan Special State Award news
Pandharpur Wari: 15 वर्षांपासूनची पंढरपूरची वारी आली फळाला! विठूमाऊलीच्या कृपेने पायाचे दुखणे झाले बरे

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी पुरस्कार स्वीकारले. महाआवास अभियान पुरस्कारात प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणमध्ये सर्वोत्कृष्ट द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार नाशिक जिल्ह्याला मिळाला.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये घरकुलांचा उद्दिष्टांप्रमाणे १०० टक्के मंजुरी देण्यात आणि राज्यपुरस्कृत आवास योजनेत घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे १०० टक्के मंजुरी देण्यात व प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य योजनेत बहुमजली इमारत बांधण्यात जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला. शबरी आवास योजनेत नाशिक जिल्हा सर्वोत्कृष्ट ठरला.

अधिकारी-कर्मचारी गटात राज्य पुरस्कृत आवास योजनेत कळवण तालुका गटविकास अधिकारी यांना तृतीय पुरस्कार प्राप्त झाला. ग्रामीण गृहनिर्माण अभियंता गटात भूषण ठाकरे (मालेगाव) यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. जिल्हाधिकारी जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महसूल, जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने घेतलेल्या परिश्रमामुळे नाशिक जिल्ह्याने महाआवास योजना पुरस्कारात बाजी मारली.

Nashik district won 5 awards in Mahaavas Abhiyan Special State Award news
Nashik News: पटपडताळणीत 26 हजार विद्यार्थी गैरहजर; आदिवासी विभागाकडून पडताळणी अहवाल सादर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com