Nashik News : मालेगावला रंगपंचमीची तयारी; दुष्काळी परिस्थितीमुळे रंग विक्रीत घट शक्य

Nashik : तालुक्यासह कसमादेत दुष्काळी परिस्थिती आहे. असे असले, तरी सण-उत्सव जोमाने साजरे होत आहेत.
Paints and color materials on the occasion of Rangpanchami at the shop.
Paints and color materials on the occasion of Rangpanchami at the shop. esakal

Nashik News : तालुक्यासह कसमादेत दुष्काळी परिस्थिती आहे. असे असले, तरी सण-उत्सव जोमाने साजरे होत आहेत. शहरात रंगपंचमीचा उत्सव नेहमीच उत्साहात हाेतो. या वर्षीही रंगपंचमीची तयारी सुरू झाली आहे. दुष्काळामुळे ठराविक व्यवसाय सोडले, तर अनेक व्यवसायांवर मंदीचे सावट आहे. रंगपंचमीसाठी पिचकारी, विविध रंग बाजारात आले आहेत. (nashik Due to drought condition rang panchami colour sales may decrease in malegaon marathi news)

या वर्षी विक्रीत घट होण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. शनिवारी (ता. ३०) रंगपंचमी साजरी होणार आहे. १५ दिवसांपासून व्यावसायिकांनी रंग व पिचकारीचे साहित्य मोठ्या प्रमाणावर भरून ठेवले आहे. रंगाचे दर गेल्या वर्षाच्या तुलनेने या वर्षी कमी आहेत. गेल्या वर्षी ७० रुपये किलोने मिळणारे रंग यंदा ५० रुपये किलोने मिळत आहेत.

बाजारात ४० ते ९० रुपये किलोपर्यंत रंगांची विक्री होत आहे. यात नैसर्गिक बनविलेल्या इको पावडर फ्रेंडली कलरला मागणी आहे. या कलरमुळे त्वचेला कुठलाही दुष्परिणाम होत नाही. लहान मुलेही या रंगांना पसंती देतात. तसेच सिल्हर, गोल्डन, ब्लॅक या तिन्ही कलरची क्रेझ वाढली आहे. यात ब्लॅक कलरला तरुण वर्गाकडून मागणी आहे.

Paints and color materials on the occasion of Rangpanchami at the shop.
Nashik News : विद्यार्थ्यांनी बघितली खरीखुरी रेल्वे!

शहरात मोसम पूल, सोयगाव मार्केट, कॅम्प परिसर, सोमवार बाजार, सटाणा नाका आदी भागांत कलर व पिचकारी विक्रीची दुकाने थाटण्यास सुरवात झाली आहे. शुक्रवार (ता. २९)पासून रंग खरेदी-विक्रीला वेग येईल. १० रुपयांपासून ते अडीचशे रुपयांपर्यंत पिचकारीचे दर आहेत. लहान मुले पाठीवरच्या टॅंक, एअर पंप यांना पसंती देत आहे.

सर्वसामान्य नागरिक पिचकारी, पाण्याची बंदूक यासह अनेक वस्तू खरेद करीत आहेत. स्ट्रा बलूनलाही पसंती मिळत आहे. पिचकारीचा माल दिल्ली व मुंबई येथून असून, तर कलर मुंबई व पुणे येथून येत आहेत.

''या वर्षी रंग खरेदीला पाहिजे तसा ग्राहक नाही. गेल्या वर्षीपेक्षा यंदा विक्रीत घट होऊ शकेल. रंगपंचमीच्या दिवशी रंगाला चांगली मागणी राहील, अशी अपेक्षा व्यावसायिकांना आहे.''-सुधीर मुसळे, नम्रता जनरल स्टोअर्स

''गेल्या अनेक वर्षांपासून मोसम पूल चौकात रंग विक्रीचे दुकान लावत आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वांना फटका बसला आहे. रंग खरेदीला अजूनतरी पुरेसा प्रतिसाद दिसत नाही.''-अनिल अमृतकर, रंग विक्रेता, मौसम पूल, मालेगाव

Paints and color materials on the occasion of Rangpanchami at the shop.
Nashik News : जिल्ह्यात 10 दिवसांत हटविले 61 हजार फलक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com