Nashik News : बांधकाम व्यावसायिकांची धाकधूक वाढली! BPMS प्रणाली बंद; बांधकाम परवानग्या रखडल्या

Nashik News : कोरोनामुळे बांधकाम व्यवसायाला चालना मिळावी म्हणून गेल्या दोन वर्षांपासून रेडीरेकनरच्या दरात वाढ करण्यात आली नाही
construction site
construction siteesakal

नाशिक : कोरोनामुळे बांधकाम व्यवसायाला चालना मिळावी म्हणून गेल्या दोन वर्षांपासून रेडीरेकनरच्या दरात वाढ करण्यात आली नाही. परंतु या वर्षात वाढ होण्याची शक्यता असल्याने आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे मार्च महिन्यात दाखल प्रकरणे मंजूर करण्यापूर्वीच बीपीएमएस ऑनलाइन परवानगी प्रणाली बंद पडल्याने बांधकाम व्यावसायिकांची धाकधूक वाढली आहे.

दुसरीकडे शासन व महापालिकांचा महसुल बुडत असतानाही बीपीएमएस प्रणाली सुरू होत नसल्याने व्यावसायिकांना कोंडीत पकडण्यासाठीचे उद्योग तर नाही ना, या शंकेने शासनाच्या नगररचना विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Nashik BPMS system Construction permits marathi news)

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली लागू करण्यात आली आहे. मुंबई वगळता संपूर्ण राज्यासाठी एकच नियमावली तयार करताना परवानगी मधील त्रुटी दूर करण्यासाठी बांधकाम परवानगी प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे.

बीपीएमएस प्रणालीच्या माध्यमातून बांधकाम परवानग्या दिल्या जातात. राज्य शासनाच्या महा-आयटी कंपनीच्या माध्यमातून ऑनलाइन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवले जाते. परंतु गेल्या दहा दिवसांपासून ऑनलाइन संगणक प्रणाली बंद झाल्याने बंद करण्यात आली आहे.

संपूर्ण राज्यातील ऑनलाइन परवानगी प्रक्रिया बंद पडल्याने मुंबई वगळता सर्वच महापालिकांचे नगररचना विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. नगररचना विभाग संचालक कार्यालयाकडून आज-उद्या आश्वासने दिली जातात, परंतु दहा दिवसांपासून बंद असलेल्या यंत्रणा दुरुस्त होत नाही.

बांधकामाच्या परवानग्या तर अडकल्याचे त्या शिवाय शासन व महापालिकांचा महसूलदेखील बुडाला आहे. लोकसभा निवडणुका असल्याने आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ३१ मार्चपूर्वीचे महसुल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

परंतु यंत्रणा ठप्प झाल्याने उद्दिष्ट वसुलीला बाधा निर्माण होत आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संघटनेने या संदर्भात निवेदन देवून ऑनलाइन प्रक्रिया तातडीने सुरु करण्याची मागणी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे केली आहे.

construction site
Hasyarang Ashitya Sammelan: हास्यरंग साहित्य संमेलनात उडणार हास्याचे फवारे! रामदास फुटाणे संमेलनाध्यक्ष

ऑफलाइनला मिळावी परवानगी

नगररचना विभागाच्या संचालक प्रतिभा भदाणे यांनी शुक्रवारी (ता. २३) सायंकाळपर्यंत यंत्रणा पुर्ववत होणार असल्याचे आश्वासन दिले, परंतु ऑनलाइन परवानगी प्रक्रिया सुरू झाली नाही. शनिवार व रविवार असे दोन दिवस सुटी असल्याने सोमवार (ता. २६) उजाडणार आहे. त्या दिवशी ऑनलाइन परवानगी प्रक्रिया सुरु न झाल्यास ऑफलाइन परवानगी देवून समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.

रेडीरेकनर दरवाढीची भीती

कोरोनामुळे दोन वर्षांपासून रेडीरेकनरचे दर वाढलेले नाही. पुढील आर्थिक वर्षात नवीन दर वाढ होण्याची शक्यता आहे. १ एप्रिल २०२४ पासून नवीन दर लागू होतील. त्यापूर्वी ऑनलाइन प्रक्रिया सुरू न झाल्यास वाढीव रेडीरेकनर दर अदा करण्याची वेळ येवू शकते, अशी भीती बांधकाम व्यावसायिकांमध्ये आहे.

"‘बीपीएमएस’ सॉफ्टवेअर तातडीने सुरू होणे गरजेचे आहे. मार्चच्या आत बांधकाम व्यावसायिकांकडून नवीन प्रकल्प मंजुरीसाठी देण्यात आले आहे. परवानगी अभावी प्रकल्प सुरू करता येत नाही."- सुनील गवादे, सचिव, नरेडको.

"क्रेडाई नाशिक मेट्रोच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, तातडीने ऑनलाइन बांधकाम परवानगीचे बीपीएमएस प्रणाली सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे."

- कृणाल पाटील, अध्यक्ष, क्रेडाई मेट्रो.

"सर्व्हर डाऊन असल्याने बांधकाम ऑनलाइन परवानगीची बीपीएमएस प्रणाली बंद आहे. यासंदर्भात महाआयटीकडे तक्रार दिली असून, लवकरच प्रणाली सुरू होईल."

- प्रशांत पगार, कार्यकारी अभियंता, नगररचना विभाग, महापालिका.

construction site
ओबीसी विद्यार्थ्यांना वसतीगृह प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र? मागासवर्ग कल्याण विभागाने मागितले शासनाकडे मार्गदर्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com