Nashik Garlic Rate Fall : आवक वाढल्याने लसूण घसरला अन भाव तीनशेवरुन 60 रुपयांवर आला!

Nashik News : महिनाभरापूर्वी अडिचशे ते तीनशे रुपये किलोने मिळणारा लसूण सामान्य कुटुंबियांच्या घरात दुर्मिळ झाला होता.
Garlic
Garlic esakal

मालेगाव : महिनाभरापूर्वी अडिचशे ते तीनशे रुपये किलोने मिळणारा लसूण सामान्य कुटुंबियांच्या घरात दुर्मिळ झाला होता. सध्या लसूणची मोठी आवक वाढली आहे. आवक वाढल्याने भाव एकदम खाली आले आहेत. सध्या किरकोळ बाजारात पन्नास ते साठ रुपये किलोने लसूण विकला जात आहे.

येथील भाजीपाला बाजारात गेल्या आठवड्याभरापासून लसणाची आवक वाढली असून, रोज सुमारे दोन टन लसूण विक्रीसाठी येत आहे. आवक वाढल्याने भावात मोठी घसरण झाली आहे. (Nashik Garlic Rate Fall Due to increase income marathi news)

जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात लसणाचा भडका उडाला होता. किरकोळ बाजारात लसूणने त्रिशतक गाठले होते. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले होते. मध्यमवर्गीय व गरिबांच्या घरात मर्यादीत लसूण वापरला जात होता. लसणाचे भाव वाढल्याने अनेक जण आयते तयार केलेले अद्रक- लसूण पेस्टचा वापर करीत होते.

येथील भाजीपाला बाजारात लसणाची आठवडाभरापासून आवक वाढली आहे. येथे सुमारे रोज दोन टन लसणाची विक्री होते. घाऊक बाजारात हलक्या दर्जाचा लसूण तीस रुपयाला तर उच्च प्रतीचा लसूण शंभर रुपये किलोने विकला जात आहे. शहरात झोपडपट्टी भागात कामगार मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत.

या भागात स्वस्त दरात मिळणाऱ्या लसणाला मोठी मागणी आहे. अनेक लहान व्यावसायिक रिक्षात लसूण भरून ६० रुपये किलोने गल्ली मोहल्ल्यातून विक्री करीत आहे. रावळगाव नाका, सटाणा नाका, महात्मा फुले भाजी बाजार, सरदार चौक, इकबाल डाबी, मच्छी बाजार, रौनकाबाद, आझाद नगर यासह रमजान निमित्त भरलेल्या विशेष बाजारांमध्येही हातगाड्यांवर लसूण मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत आहे. येथे हायब्रीड जातीचा लसूण प्रामुख्याने विक्रीस येत आहे. (latest marathi news)

Garlic
Holi 2024 : चेहऱ्यावरील रंग जात नाही? मग, करा 'हे' घरगुती उपाय

भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी काढले कच्चे लसूण

डिसेंबर ते मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत येथे लसणाला चांगला भाव मिळत होता. मध्यप्रदेशमधून मोठ्या प्रमाणावर लसूण विक्रीसाठी येतो. चांगल्या भावाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कच्चे व ओले लसूण काढले. यामुळे बाजारात आवक वाढली. परिणामी लसणाच्या किंमती घसरल्या. इंदूर, रतलाम आदी भागांमध्ये लसणावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर त्याचा परिणाम झाल्याचे येथील व्यापारी दिलीप अभोणकर यांनी सांगितले.

"लसूण स्वस्त झाल्याने रिक्षावर विक्री करीत आहे. ग्राहकांना कमी किंमतीत व घराजवळ लसूण मिळत आहे. रिक्षावर दिवसभरात दोन क्विंटल लसूण विक्री करतो. किलोमागे पाच रुपये मिळत आहे. दिवसाकाठी हजार रुपये मिळतात."- जुबेर शेख, लसूण विक्रेता

Garlic
Nashik Success Story : डोंगरजेच्या तृप्तीची तहसिलपदाला गवसणी! जिद्द, चिकाटीच्या बळावर मिळवले यश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com