Nashik Ram Rathotsav : रामजीकी निकली सवारी.... अभूतपूर्व उत्साहात श्रीराम, गरुड रथोत्सव

Ram Rathotsav : भाविकांच्या प्रचंड उत्साहात शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी गरुड व श्रीरामरथ काळाराम मंदिर पूर्व दरवाजापासून मार्गस्थ झाला.
A procession of Shri Ram, Garudartha was taken out from Shri Kalaram temple on Friday to the sound of traditional drums, during which a large crowd of people from Nashik was gathered.
A procession of Shri Ram, Garudartha was taken out from Shri Kalaram temple on Friday to the sound of traditional drums, during which a large crowd of people from Nashik was gathered.esakal

Nashik Ram Rathotsav : सियावर रामचंद्र की जय... पवनसूत हनुमान की जय जयघोषात, भाविकांच्या प्रचंड उत्साहात शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी गरुड व श्रीरामरथ काळाराम मंदिर पूर्व दरवाजापासून मार्गस्थ झाला. फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीसह विविध ढोलपथकांच्या वादनाने परिसर दणाणून गेला होता. विधिवत पूजनानंतर सात वाजता गरुड, तर साडेसात श्रीरामरथ निघाला. (nashik Garud rath and Shri Ram Rath from Kalaram temple )

श्रीराम नवमीनंतर येणाऱ्या कामदा एकादशीला राम व गरुड रथोत्सवाची प्राचीन परंपरा आहे. नाशिकचा ग्रामोत्सव असलेल्या श्रीराम आणि गरुड रथयात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला. प्रत्येक चौकात आकर्षक रांगोळ्या काढून आणि रथयात्रेवर फुलांची उधळण करत दोन्ही रथाचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. रथोत्सव सोहळा पाहण्यासाठी श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजाजवळ हजारो भाविकांची गर्दी अशा भक्तिमय अन् उत्साहाच्या वातावरणात रथोत्सवाला प्रारंभ झाला.

सात वाजता गरुडरथाने तर साडेसात वाजेच्या सुमारास श्रीराम रथोत्सवास प्रारंभ झाला. मिरवणुकीला प्रारंभ होण्यापूर्वी यावर्षीचे पूजेचे मानकरी राघवेंद्रबुवा पुजारी यांच्या हस्ते श्री काळाराम मंदिरात श्रीराम पंचायतीची महापूजा करण्यात आली. त्यानंतर पूजा केलेल्या भोग मूर्ती सजविलेल्या पालखीत ठेवून काळाराम मंदिराला प्रदक्षिणा घालून कहार मंडळींनी पालखी पूर्व दरवाजाने गरुड रथापर्यंत आणण्यात आली.

त्यानंतर महाआरती करून पुन्हा भोगमूर्ती रामरथामध्ये तर श्रीरामाच्या पादुका गरुड रथामध्ये ठेवण्यात आल्या. गरुड रथ अहिल्याराम व्यायामशाळेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तर रास्ते आखाडा तालीम संघाच्या कार्यकर्त्यांनी श्रीरामाचा रथ ओढला. श्री काळाराम मंदिरापासून निघालेला गरुड रथ व श्रीरामरथ ढिकलेनगर, नाग चौक, काट्या मारुती पोलिस चौकी, गणेशवाडीमार्गे गाडगे महाराज पुलाखालून गोदाघाटावर पोचले. (latest marathi news)

A procession of Shri Ram, Garudartha was taken out from Shri Kalaram temple on Friday to the sound of traditional drums, during which a large crowd of people from Nashik was gathered.
Nashik Ram Rathotsav : रामरथ, गरुड रथ मिरवणूक आज कडेकोट पोलिस बंदोबस्त; वाहतूक मार्गातही बदल

त्यानंतर श्रीरामरथ म्हसोबा पटांगण येथे थांबवण्यात आला तर गरुड रथ नगर प्रदक्षिणेसाठी रोकडोबा व्यायामशाळा, दिल्ली दरवाजा, दहीपूल, नेहरू चौक, दहिपूल, मेनरोड, सरकारवाडा, भांडी बाजारमार्गे म्हसोबा पटांगण येथे आला. तेथून गरुडरथ त्यापाठोपाठ श्रीरामरथ रामतीर्थाकडे मार्गस्थ झाला. यावेळी गोदाघाटावर भाविकांची अभूतपूर्व गर्दी उसळली होती.

कापड बाजारात गरुड रथ येताच जोरदार घंटानाद करण्यात आला. बालाजी संस्थानचे महंत बालाजीवाले यांनी रथाचे स्वागत केले. तेथे रथाची आरती करण्यात आली. रामतीर्थावर दोन्ही रथ एकत्र आले. तेथे श्रींना अवभृतस्नान घालण्यात आले. रामतीर्थावरील अवभृत स्नानानंतर दोन्ही रथ रात्री उशिरा मूळस्थानाकडे मार्गस्थ झाले.

*ढोलपथकात मोठ्या प्रमाणात तरुणीही.

* रथयात्रेचे ठिकठिकाणी भव्य रांगोळ्यांनी स्वागत.

* गरुड रथाचे भांडी बाजारात घंटानादाने स्वागत.

* चौकाचौकात फटाक्यांची जोरदार आतषबाजी.

* गोदाघाटावर यात्रोत्सवातून लाखो रुपयांची उलाढाल.

* श्रीराम जानकीच्या वेशभूषेतील तरुण-तरुणी ठरले लक्षवेधी.

A procession of Shri Ram, Garudartha was taken out from Shri Kalaram temple on Friday to the sound of traditional drums, during which a large crowd of people from Nashik was gathered.
Nashik Ram Navami 2024 : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क! पोलीस आयुक्तांकडून कडेकोट बंदोबस्ताच्या सूचना

* पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील पन्नास अधिकाऱ्यांसह साडेतीनशे पोलिस बंदोबस्तावर.

* गोदाघाटावर उसळली प्रचंड गर्दी.

* यंदाचे पूजेचे मानकरी राघवेंद्रबुवा पुजारी यांचे रथाकडे तोंड करून मार्गक्रमण.

* दोन्ही रथांसह पालखीवर आकर्षक विद्युत रोषणाई.

* भांडी बाजारात घंटानादाद्वारे गरुड रथाचे स्वागत.

* रामरथाचे सारथ्य नंदू मुठे यांच्याकडे तर गरुड रथाचे चंदन पूजाधिकारी यांच्याकडे.

* रथयात्रेपुढे प्रथमच शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके.

* रास्ते आखाडा तालीम संघाकडे श्रीरामरथ तर अहिल्याराम व्यायामशाळेकडे गरुड रथाचे नेतृत्व.

* अवभृत स्नानानंतर पहाटेच्या सुमारास दोन्ही पुन्हा मूळ स्थानाकडे मार्गस्थ.

प्रमुख उपस्थिती -

खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲड. राहुल ढिकले, देवयानी फरांदे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, सहाय्यक आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, डॉ. सीताराम कोल्हे, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, लक्ष्मण सावजी, महंत भक्तीचरणदास, रावसाहेब कोशिरे, मंदार जानोरकर, धनंजय पुजारी, पंचवटीचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, भद्रकाली, म्हसरूळ, आडगाव, भद्रकालीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सरदार रास्ते तालीम आखाडा.

A procession of Shri Ram, Garudartha was taken out from Shri Kalaram temple on Friday to the sound of traditional drums, during which a large crowd of people from Nashik was gathered.
Nashik Ram Rathotsav 2023 : पोलिस, मनपाकडून रथ मार्गाची पाहणी; तयारी अखेरच्या टप्प्यात!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com