Nashik News : ‘इस्‍पॅलियर’ च्‍या चळवळीला शासनाचे बळ! शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक, मंत्रिमंडळात निर्णय

Nashik News : प्रत्‍येक मंत्रिमंडळ बैठकीप्रमाणे सोमवारी (ता.११) मंत्रालयात पार पडलेल्‍या बैठकीतही विविध विभागातर्फे व महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
Espalier School
Espalier Schoolesakal

नाशिक : प्रत्‍येक मंत्रिमंडळ बैठकीप्रमाणे सोमवारी (ता.११) मंत्रालयात पार पडलेल्‍या बैठकीतही विविध विभागातर्फे व महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमध्ये चर्चेला गेलेला आणि स्‍त्री-पुरुष समानतेची बीजे रुजविणारा,‘ति’ ला सन्‍मान मिळवून देणारा निर्णय घेतला गेला. सर्व शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक करण्याच्‍या या निर्णयातून साधारणतः तेरा वर्षांपूर्वी इस्‍पॅलियर स्‍कूलने सुरु केलेल्‍या चळवळीला शासनाचे बळ मिळाले आहे. (Nashik government strength to movement of Espalier school marathi news)

नाशिकच्या इस्पॅलियर स्कूलने तेरा वर्षांपूर्वी अनोखा पुढाकार घेतला होता. याअंतर्गत विद्यार्थी, शिक्षक यांनी आपल्या नावानंतर आईचे व त्या पाठोपाठ वडिलांचे नाव लिहिण्यास सुरवात केली. इतक्यावर न थांबता शाळांमध्ये व विविध व्यासपीठांवर अशा स्वरूपाने नाव लिहिण्याचे आवाहन शाळेतर्फे वेळोवेळी केले गेले.

त्यास चांगला प्रतिसाद मिळत होता. त्‍यामुळे केवळ शाळेपुरता हा उपक्रम मर्यादित न राहाता इतर शाळांकडूनही प्रतिसाद वाढता होता. गुजरात राज्यातील एका शाळेने आठ वर्षांपूर्वी या सूचनेचे स्‍वागत करतांना विद्यार्थ्यांच्या नावात बदल केला होता. तेव्हापासून शैक्षणिकसोबत सामाजिकस्तरावरदेखील ही चळवळ सक्षम बनली होती.

समाज माध्यमावर अनेक लोकांनी आपल्या नावासोबत आईच्या नावाचा उल्लेख करताना तिच्या सन्मानार्थ सुरू केलेल्‍या चळवळीला बळ दिले. नाशिकच्‍या मातीतून सुरु झालेल्‍या या चळवळीची दखल थेट महाराष्ट्र शासनाने घेतली होती. (Latest Marathi News)

Espalier School
G.N Saibaba Acquittal: सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका, साईबाबांच्या निर्दोषत्वाच्या स्थगितीबाबत दिला महत्वाचा निर्णय

सोमवारी झालेल्‍या मंत्रिमंडळ बैठकीत महिला व बालविकास विभागाअंतर्गत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्‍यानुसार आता शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक करण्यात आलेले आहे.या निर्णयाचे नाशिकसह सर्व स्तरावरून कौतुक होते आहे.

"मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी महिला व बालकल्‍याण विभागाशी निगडित महत्त्वाचा विषय पारीत झाला. त्‍यानुसार शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक केले आहे. पूर्ण नावात आईचे नाव घेतल्याबद्दल राज्‍य शासनाचे आभार मानतो. गेल्या तेरा वर्षांपासून इस्पॅलिअर स्कूल समाजामध्ये जनजागृती आणत असून त्‍याला यश आले आहे."

- सचिन उषा विलास जोशी.

Espalier School
Smartphone Addiction : स्मार्टफोन-सोशल मीडियाशिवाय आनंदी आणि शांत वाटतं, मात्र सवय सोडणं शक्य नाही! काय म्हणतायत लहान मुलं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com