Dada Bhuse : वनहक्कधारकांना 133 योजनांचा मिळणार लाभ; पालकमंत्री दादा भुसे यांचा पाठपुरावा

Dada Bhuse : राज्यातील आदिवासी समाजासह वनहक्कधारकांना तब्बल १३३ शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.
Dada Bhuse
Dada Bhuse esakal

Dada Bhuse : राज्यातील आदिवासी समाजासह वनहक्कधारकांना तब्बल १३३ शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंनी यासंदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे. पी. गावित यांना महामुक्काम मोर्चाच्या वेळी आश्‍वासन दिले होते. दरम्यान, आदेशाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. (nashik Guardian Minister Dada Bhuse statement of Forest rights holders will get benefit of 133 schemes marathi news )

वनहक्क जमिनींबाबत आंदोलने, मोर्चेही काढण्यात आले. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) नियम २०१२ ची अंमलबजावणी व्हायला हवी, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली. यांसह आदिवासी बांधवांचे प्रमुख प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी २७ फेब्रुवारीला बैठक घेतली.

यानंतर मंत्री दादा भुसे यांनी पाठपुरावा करून वनहक्कधारकांना तब्बल १३३ शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. याबाबतचे शासकीय आदेश निर्गमित झाला असून, पुढील आदेशही दिले आहेत. (latest marathi news)

Dada Bhuse
Dada Bhuse : कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण सरकारच्या माध्यमातून दिले जाईल : दादा भुसे

असे आहेत शासकीय निर्देश

- वनहक्कधारक ज्या शासकीय योजनांच्या लाभास पात्र आहेत त्याबाबत जनजागृती

- ज्या योजनांचे लाभ वैयक्तिकरीत्या देणे शक्य आहे अशा योजनांचा लाभ विनाविलंब वनहक्कधारकांना देण्यात यावा

- वनपट्टे दिलेल्या वनहक्कधारकांचे क्षेत्रनिहाय समूह तयार करणार

- कालबद्ध आराखडा तयार करून विविध शासकीय योजनांचा लाभ द्यावा

- सामुदायिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करावे

- अडचणींचे निराकरण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कन्व्हर्जन्स समितीने त्वरित करावे

Dada Bhuse
Dada Bhuse : नाशिक लोकसभा मतदारसंघ आम्ही सोडणार नाही; पालकमंत्री दादा भुसेंचे भाजपला प्रत्युत्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com