Nashik News : निधी वितरणासाठी कोशागारात ‘ई-कुबेर’ प्रणाली : महेश बच्छाव

Nashik : जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, तसेच शासकीय योजनांच्या निधी वितरणाची कार्यवाही जलद गतीने करण्यासाठी जिल्हा कोशागारमध्ये ‘ई-कुबेर’ ही संगणकीय प्रणाली कार्यान्वित केली आहे.
Funding
Fundingesakal

Nashik News : जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, तसेच शासकीय योजनांच्या निधी वितरणाची कार्यवाही जलद गतीने करण्यासाठी जिल्हा कोशागारमध्ये ‘ई-कुबेर’ ही संगणकीय प्रणाली कार्यान्वित केली आहे. कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत तत्काळ रक्कम प्रदान करणे सोयीस्कर होते. इतकेच नव्हे, तर धनादेश वटविण्याची प्रक्रिया तातडीने होणार असल्याचे जिल्हा कोशागार अधिकारी महेश बच्छाव यांनी सांगितले. (Nashik Mahesh Bachhav statement E Kuber system in treasury for disbursement of funds)

सर्व निवृत्तिवेतनधारक, कुटुंब निवृत्तिवेतनधारकांची मासिक पेन्शन यापुढे शासनाच्या ई-कुबेर प्रणालीमार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेतून थेट निवृत्तिवेतनधारकाच्या खात्यात जमा होणार आहे. निवृत्तिवेतन जमा करण्यासाठी निश्‍चित केलेल्या बँक खात्यात आयएफएससी कोडनुसार ती जमा होईल. या प्रणालीमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात रकमांचे तत्काळ थेट प्रदान करणे सोयीस्कर होणार आहे.

धनादेश वटविण्याची प्रक्रिया तातडीने केली जाईल. देयके अदा करण्यातील विविध टप्पे कमी होतील. शासनाकडून प्राप्त विविध योजनांचा निधी संबंधित विभागाच्या बँक खात्यात दीर्घकाळ अखर्चित पडून राहणार नाही. शासन निधीच्या जमा व खर्चाची प्रक्रिया सुलभ होणार असल्यामुळे शासनाकडून नवीन निधी मिळण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडणार आहे. (latest marathi news)

Funding
Nashik Rang Panchami : कामातून मुक्त होत अधिकारी-कर्मचारी थिरकले! पोलिस आयुक्तालयात रंगपंचमी उत्साहात

परस्पर बँक खात्यात बदल नको!

कोशागार कार्यालयाची परवानगी न घेता निवृत्तिवेतनधारकांनी परस्पर बँक खाते इतर जिल्ह्यात किंवा दुसऱ्या बँकेत वर्ग केले असेल, तर अशा निवृत्तिवेतनधारकांचे निवृत्तिवेतन जमा होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.

ज्या निवृत्तिवेतनधारकांनी परस्पर बँक व बँक खात्यात बदल करून घेतले असतील, त्यांनी त्यांचे मूळ बँक खाते ज्या ठिकाणी असेल तेच खाते सुरू ठेवावे. भविष्यात निवृत्तिवेतनाबाबत अडचणी निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी निवृत्तिवेतनधारकांची असणार आहे, अशी सूचना कोशागार विभागाने केली आहे.

Funding
Nashik March End Recovery: मार्च एंडिंगसाठी रात्रभर जागली सरकारी कार्यालये! मध्यरात्रीपर्यंत अधिकारी अन कर्मचाऱ्यांची धावपळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com