Nashik News : MIDCचा पार्किंग झोन उरला नावालाच! मुख्य रस्त्यांवर सर्रास कंटेनर पार्किंग

Nashik News : सातपूर औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्त्यासह मिळेल त्या ठिकाणी कंटेनर पार्किंग केले जात असल्याने एमआयडीसीला कंटेनरचा विळखा पडल्याचे चित्र आहे
Unauthorized standing containers on roadsides.
Unauthorized standing containers on roadsides. esakal

सातपूर : सातपूर औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्त्यासह मिळेल त्या ठिकाणी कंटेनर पार्किंग केले जात असल्याने एमआयडीसीला कंटेनरचा विळखा पडल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे एमआयडीसीने सातपूरला अवजड वाहने पार्किंगसाठी स्वतंत्र भूखंड नाममात्र दराने उपलब्ध करून दिलेला असताना हा पार्किंग झोन नावालाच असल्याचे चित्र आहे. (Nashik MIDC parking zone congested marathi news)

सातपूर एमआयडीसीत सर्वाधिक कंपन्या आहेत. तर अंबड एमआयडीसीत लघू व मध्यम उद्योगांचे मोठे जाळे पसरले आहे. वाढत्या कंपन्यांमुळे सहाजिकच कच्चा माल घेऊन येणारे व पक्का माल घेऊन जाणारे कंटेनर शेकडोंच्या संख्येने एमआयडीसीत येत असतात.

एमआयडीसीने सातपूरला अवजड वाहने पार्किंगसाठी स्वतंत्र भूखंड नाममात्र दराने उपलब्ध करून दिला आहे. तसेच अंबड एमआयडीसीतही अवजड वाहने पार्किंगसाठी भूखंड आरक्षीत करण्यात आला आहे. असे असतानाही एमआयडीसीतील मुख्य रस्त्यांवर सर्रास कंटेनर पार्किंग केली जात असल्याने याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

एमआयडीसीतील मुख्य रस्त्यांच्या कडेला अवजड वाहने उभी राहत असल्याने कामगारांनाच सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. सायंकाळी कंपनीतून घरी जातांना महिला कामगारांनाही रस्त्यांच्या कडेला उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे जीव मुठीत घालून प्रवास करण्याची वेळ येते. (Latest Marathi News)

Unauthorized standing containers on roadsides.
Nashik News : आसखेड्यातील ऐतिहासिक वास्तुंचे रुपडे पालटणार : आमदार बोरसे

विशेष म्हणजे याकडे महापालिका, एमआयडीसी व वाहतूक पोलिस लक्ष घालत नसल्याने अवजड वाहन चालक मिळेल त्या ठिकाणी आपली वाहने पार्क करताना दिसतात. महापालिका, पोलिस व एमआयडीसी प्रशासनाचा याकडे काणाडोळा होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

एमआयडीसीत उद्योगांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तरुण उद्योजकांकडून नेहमीच केली जाते. निमा व आयमा औद्योगिक संघटनेकडूनही सातत्याने शासनाकडे उद्योगांसाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली जाते.

सातपूर व अंबड एमआयडीसीत जागाच नसल्याने वरिष्ठ कार्यालयाकडून सांगितले जाते. परंतु चक्क एमआयडीसीचाच मोकळा भूखंड अनधिकृत पार्किंगसाठी दिलाच कसा जातो, असा सवाल कामगारांनी केला आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून कंटेनर पार्किंग होत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

"अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते व अपघाताच्या घटना घडत आहे. रस्त्यावर उभ्या कंटेनर पार्किंगसाठी एमआयडीसी ने सोय करावी"- सलीम शेख, मनसे प्रदेश उपाध्यक्ष

Unauthorized standing containers on roadsides.
National Peoples Court: लोकन्यायालय ही आदर्श संकल्पना : न्यायाधीश अमित कोष्टी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com