Nashik Crime News : जनावरांची निर्दयपणे वाहतूक; पोलिसांकडून 33 जनावरांची सुटका

Nashik Crime : वाहनांमध्ये क्षमता नसताना गोवंश जनावरे कोंडून, डांबून त्यांची निर्दयपणे व जिवंतपणी मरणयातना देऊन वाहतूक होत असल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी गोवंश रक्षक व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या जागरूकतेमुळे उघड झाला.
cattle (file photo)
cattle (file photo)esakal

वावी : वाहनांमध्ये क्षमता नसताना गोवंश जनावरे कोंडून, डांबून त्यांची निर्दयपणे व जिवंतपणी मरणयातना देऊन वाहतूक होत असल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी गोवंश रक्षक व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या जागरूकतेमुळे उघड झाला. सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे एमआयडीसी पोलिसांनी ३३ जनावरांची सुटका करत वाहतूक करणारी सात वाहने जप्त केली. याप्रकरणी १३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (nashik MIDC police rescued 33 animals marathi news)

निफाड तालुक्यातील विविध गावांमधून एकाच वेळी ७ वाहनांमधून गोवंशीय ३३ लहान-मोठी जनावरे पंचाळे मार्गे कोपरगाव कडे नेण्यात येत असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. कार्यकर्त्यांनी ११२ या आपत्कालीन क्रमांकाला फोन करून पोलिसांना सतर्क केले होते.

जनावरांची वाहतूक करणारी वाहने पंचाळे मार्गे कोपरगावकडे जात असताना मागावर असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पंचाळे गावाच्या पुढे सूर्यभानजी गडाख शाळेसमोर ती अडवली. मुसळगाव पोलिसांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक यशवंत बाविस्कर, उपनिरीक्षक पाटील, लोंढे, हवालदार भगवान शिंदे, विनोद इप्पर यांच्या पथकाने तातडीने धाव घेतली.

पोलिसांनी सदर वाहनांची तपासणी केली असता त्यांच्याकडे जनावरांच्या वाहतुकीचा कुठलाही परवाना आढळून आला नाही. याशिवाय प्रत्येक वाहनात ४-५ जनावरे निर्दयीपणे कोंबलेली आढळून आली. एका वाहनात तर तब्बल ११ जनावरे कोंबललेली आढळली. पोलिसांनी वाहनांसह ही जनावरे ताब्यात घेतली.  (latest marathi news)

cattle (file photo)
Nashik Crime News : ट्रक टर्मिनल येथून ट्रक चोरीला! 2 दिवसात चोरीच्या घटनांत वाढ

याप्रकरणी पोलिसांनी २ बोलेरो पिकअप, ३ छोटा हत्ती, २ मॅक्स पिकअप अशी सुमारे १५ लाख रुपये किमतीची ७ वाहने ताब्यात घेण्यात आली. तर या वाहनांमधील सुटका केलेल्या जनावरांचे मूल्यांकन सुमारे एक लाख ८७ हजार रुपये इतके करण्यात आले. पोलीस नाईक अमोल सदगीर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

रमेश धुमाळ (निफाड), सोमनाथ गावले (सोनगाव), सचिन कदम (चितेगाव), चंद्रकांत अंभोरे (चांदोरी), सुनील कांबळे (चांदोरी), चंद्रकांत भोज (चांदोरी), प्रकाश चव्हाण (चांदोरी) या वाहन चालकांसह त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या संदीप भोकनळ (वडांगळी), नरहरी निरभवणे (करंजगाव), शिवाजी जाधव (चेहडी), सुनील चौधरी (ओझर), शांताराम लांडगे (खेरवाडी), साईनाथ काळे (चांदोरी) या जनावरे मालकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सदर जनावरे विक्रीसाठी कोपरगाव येथे घेऊन जात असल्याचे या सर्वांचे म्हणणे होते. वाहनांमध्ये निर्दयपणे वाहतूक केल्या जाणाऱ्या जनावरांची सुटका करण्यात आली. ही जनावरे तहान व भुकेने व्याकुळ झालेली होती. बजरंग दल कार्यकर्त्यांनी त्यांना जागेवर चारा व पाण्याची व्यवस्था केली. त्यानंतर सिन्नर येथील हरी ओम गोशाळेचे संजय चोथवे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी ही सर्व जनावरे गोशाळेपर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था केली.

वाहतूक होणारी सर्व जनावरे गोवंश होती. लहान वासरे, कालवडी पूर्ण वाढ झालेल्या गाईंचा व एका म्हशीचा त्याचा समावेश होता. वाहन चालक व जनावरांचे एकत्रित मालक ही जनावरे विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगत असले तरी ज्या निर्दयतेने जनावरांची वाहतूक करण्यात आली ते बघता त्यांचा उद्देश चांगला नव्हता. कत्तलीसाठीच ही जनावरे संबंधित व्यापाऱ्यांकडे पोहोचवली जात असल्याचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला.

cattle (file photo)
Nashik Crime News : रिक्षातून देशी दारुची तस्करी! दोघांना अटक; गुन्हेशाखेची कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com