Nashik News : दीड लाख विद्यार्थी सेमी इंग्रजीच्या वर्गात! जिल्ह्यात पहिल्याच दिवशी 4 लाख 66 हजार पुस्तकांचे होणार वाटप

Nashik : आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके वाटपासाठी शिक्षण विभाग सरसावला आहे.
SAKAL Exclusive
SAKAL Exclusiveesakal

Nashik News : आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके वाटपासाठी शिक्षण विभाग सरसावला आहे. ३१ मे पर्यंत तालुकास्तरावर पुस्तके पोहोच केली जाणार असून यावर्षी जिल्ह्यात मराठी,सेमी,उर्दू, हिंदी व इंग्रजी माध्यमांची मिळून ४ लाख ६६ हजार ३६९ संच विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. याशिवाय शाळांकडे शिल्लक असलेले सुमारे २७ हजार संच देखील विद्यार्थ्यांना वाटप होणार आहेत. (Nashik One and half lakh students in Semi English class in district marathi news)

विशेष म्हणजे तब्बल दीड लाख संच सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना हवे आहेत. सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणीनंतर २००९ पासून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी माध्यमांच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटली जातात.

जूनमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके देऊन विद्यार्थ्यांच्या स्वागताचे नियोजन सुरू आहे. अंबड येथील बालभारतीच्या पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्रातून प्रत्येक गट स्तरावर शिरीष कार्गो सर्विसेस या वाहतूकदारामार्फत पुस्तके पुरविली जाणार आहेत.

जिल्हा स्तरावर पुस्तके आल्यावर गट शिक्षण अधिकाऱ्यांना एक दिवस अगोदर सूचना देउन पुस्तके ठेवण्याची पूर्वतयारी आत्ताच करण्याच्या सूचना आहेत. केंद्र शाळेवरून शाळा स्तरापर्यंत पुस्तके वितरित केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया मे जूनमध्येच होणार असून पहिल्याच दिवशी पुस्तके वितरण होणार आहे.

पुस्तके बालभारती पोर्टलवर नोंदविलेल्या मागणीनुसार देण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी मराठी माध्यमांची ३ लाख ९ हजार ७६१,सेमी इंग्रजी माध्यमाची १ लाख ४७ हजार,उर्दू माध्यमाची ८ हजार ५६,उर्दू सेमी इंग्रजीची ५६, हिंदीची १६४, इंग्रजी माध्यमांची १०२५ असे ४ लाख ६६ हजार ३६९ पुस्तके वितरित होणार आहेत. (latest marathi news)

SAKAL Exclusive
Nashik News : रावळगावला चोऱ्यांचे सत्र सुरुच; कृषी साहित्य चोरीने शेतकरी त्रस्त

पुस्तकाची बांधणी व छपाईत दोष आढळल्यास तालुकास्तरावरुन यादी करून पाठ्यपुस्तक भांडारात देण्याची सवलत आहे. यावर्षीही पुस्तकांत कोरी पाने असतील याचा फायदा विद्यार्थ्यांना वर्ग अध्यापनात होणार आहे.

सेमीचे विद्यार्थी वाढता वाढे...

मराठी माध्यमाची सर्वाधिक पुस्तके मालेगाव व बागलाण या तालुक्याला हवी आहेत. जिल्ह्यात तब्बल दीड लाख विद्यार्थी सेमी इंग्रजी माध्यमांची शिक्षण घेत असल्याने सेमी कडे कल वाढल्याचे दिसते.

सेमी इंग्रजीत सर्वाधिक विद्यार्थी निफाड तालुक्यात असून त्या खालोखाल सिन्नर,बागलाण,चांदवड, येवल्यात पुस्तक संच हवे आहेत. उर्दू माध्यमांची पुस्तके मालेगाव व येवल्यात सर्वाधिक मागणी झालेली आहे तर इंग्रजी माध्यमांची नाशिकमध्ये ३५७,इगतपुरी ३२३ तर निफाडमध्ये १३८ संचाची मागणी झाली आहे.

"गटस्तरावर पुस्तके पुरवठा करण्यात येणार असून त्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाहतूकदारामार्फत सर्व पाठ्यपुस्तके पोहोच होतील.पुस्तके स्वीकारताना खराब, फाटलेली,ओली पुस्तके तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. गटस्तरावरून केंद्र शाळेवर व तेथून शाळापर्यंतही पाठ्यपुस्तके पोहोचून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वाटप केले जाईल."- डॉ.नितीन बच्छाव,प्राथमिक शिक्षणाधिकारी, नाशिक

SAKAL Exclusive
Nashik News : ‘FLN’ चाचणीमुळे उन्‍हाळी सुटी लांबणीवर; ऐनवेळच्या पत्रकामुळे घोळ

असे मिळणार पहिली ते आठवीची पाठयपुस्तके

तालुका - मराठी माध्यम - सेमी इंग्रजी - उर्दू

बागलाण - ३००३० - १४४४६ - ४५५

चांदवड - ११७४३ - १४२०९ - १८३

देवळा - ७८०२ - ८०८८ - ००

दिंडोरी - २९६९४ - ९४३६ - ००

इगतपुरी - २३५०४ - ५२१७ - २३५

कळवण - १९९७९ - ५२१५ - १०

मालेगाव - ३६३५५ - १०४५७ - ३५०५

नांदगाव - २३५६५ - १०३८१ - १२०८

नाशिक - १४८०८ - ९५४१ - ५९

निफाड - १९२९१ - २४०२३ - ४४०

पेठ - १८७८५ - ७२७ - ००

सिन्नर - १५३७८ - २०८५६ - ९६

सुरगाणा - २४२२३ - ५० -००

त्रंबकेश्वर - २४१४७ - १००८ - ००

येवला - १०४५७ - १३६३३ - १८६५

एकूण - ३०९७६१ - १४७३०७ - ८०५

SAKAL Exclusive
Nashik News : दिव्यांग योगेश एका हाताने तयार करतोय कांदा चाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com