नाशिक : अनपेक्षितपणे बाजारभाव कोसळल्याने कांदा शेतकरी संकटात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik

नाशिक : अनपेक्षितपणे बाजारभाव कोसळल्याने कांदा शेतकरी संकटात

खेडलेझुंगे : राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या प्रकोपामुळे लाल कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. दिवाळीनंतर लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक येऊन विक्रीसाठी सज्ज असत. परंतु सद्यस्थितीला बाजारपेठांमध्ये लाल कांदा आवक नाही. त्यामुळे उन्हाळ कांद्याची दरवाढ होईल, अशी खात्री शेतकऱ्यांना निर्माण झाली होती.

लाल कांद्यात झालेला तोटा उन्हाळ कांदा विक्रीतून भरावा, या आशेने बहुसंख्य शेतकऱ्यांनी साठविलेला कांद्याची दिवाळीनंतर विक्री करावी, या आशेने चाळीत ठेवला.परंतु घसरत्या बाजारभावाने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. आज बाजारात विक्रीला आलेला कांदा डोंगळे लागवड व संगोपन, बी निर्मिती, रोपनिर्मिती, लागवड व काढणी, साठवणूक आणि विक्री यासारख्या टप्प्यातून दोन ते अडीच वर्षाच्या कालावधीतील मेहनतीने निर्माण झाला आहे. त्यामुळे वजनघट आणि सडघाण विचारत घेता किमान पाच हजारापेक्षा अधिक भावाने कांदा विक्री होणे अपेक्षित होते. पण सरकारने आयात करून आणि बफर स्टॉकमधील कांदा बाजारात विक्रीस आणून देशांतर्गत बाजारभाव स्थिर केले. याचा कोट्यवधीचा फटका शेतकरी वर्गास बसला आहे.

हेही वाचा: तुम्हाला OK या शब्दाचा अर्थ किंवा फुलफॉर्म माहिती आहे का?

कांदा दरात सातत्याने झालेली घट

दिवाळीपूर्वी कांदा सरासरी ३५ ते ४० रुपये प्रति किलोने विक्री होत होता. दिवाळीनंतर सरासरी १५ ते २० रुपये प्रती किलो दराने विक्री होत आहे. १५ ते २० दिवसात कांदा दरात २० रुपये प्रती किलो भावात घट झाली आहे.

हेही वाचा: "खूप चुकीचं आहे"; वॉर्नर मालिकावीर अन् अख्तरचं जळजळीत विधान

महापूर- अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांना कांदा बाजारभाव वाढीमुळे मोठा आधार मिळाला असता. परंतु सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे सोडून कांदा आयात केला.

- जगन काकडे, जिल्हाप्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष युवा.

शेतकऱ्यांनी कर्ज, वीजबिल भरावे आणि सहकार्य करावे, अशी अपेक्षा करणाऱ्या सरकारने बाजारभाव पाडून शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल देण्याऐवजी त्यास आधीपेक्षा मोठ्या कर्जाच्या खाईत लोटले.

- गजानन घोटेकर, अध्यक्ष, शेतकरी संघटना निफाड पूर्व

ऐनवेळी आयात करणे किंवा बफर स्टॉकमधील माल विक्रीस काढणे, यामुळे शेतकऱ्यांना मेहनतीचे मोल देण्याऐवजी त्यांना पंगू बनवून व्यवस्थेच्या दारी लाचार म्हणून बांधले जात आहे.

- दिगंबर गीते, युवा शेतकरी

loading image
go to top