Pension Schema : पेन्शनधारकांनो ई-जीवन प्रमाणपत्र जमा करा : अनिल कुमार प्रीतम

Pension Schema : नाशिक जिल्ह्यातील भविष्य निधी पेन्शनधारकांनी ई-जीवन प्रमाणपत्र जमा करण्याचे आवाहन क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त अनिल कुमार प्रीतम यांनी केले आहे.
Pension Schema
Pension Schemaesakal

Pension Schema : नाशिक जिल्ह्यातील भविष्य निधी पेन्शनधारकांनी ई-जीवन प्रमाणपत्र जमा करण्याचे आवाहन क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त अनिल कुमार प्रीतम यांनी केले आहे. भविष्य निधी भवन (ई.पी.इफ.ओ.) चे ई पी एस-१९९५ च्या पेन्शनधारकांनी आधारला जोडलेले ई जीवन प्रमाणपत्र जमा करणे अनिवार्य आहे. कर्मचारी पेंशन योजना-१९९५ व कर्मचारी पेन्शन योजना -१९७१ च्या अंतर्गत पेन्शनधारकांनी आपली पेन्शन चालू ठेवण्यासाठी वर्षातून एकदा आपल्या आधारला जोडलेले ई-जीवन प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक असते. (nashik Pension Scheme Anil Kumar Pritam marathi news)

भविष्य निधी कार्यालय नाशिक अंतर्गत आतापर्यंत १७५०९९ पेन्शन धारकांपैकी १५२३४५ इतक्या पेन्शन धारकांनी ई-जीवन प्रमाणपत्र जमा केले असून त्यांची पेन्शन नियमित चालू आहे, मात्र अजूनही २२७५४ इतक्या पेन्शनधारकांनी ई जीवन प्रमाणपत्र जमा केलेले नाही. त्यामुळे त्यांनी खालील ठिकाणी आपले ई-जीवन प्रमाणपत्र करून घ्यावे.

ई- जीवन प्रमाणपत्र जमा केलेल्या तारखेपासून ते एक वर्षापर्यंत वैध राहणार आहे. म्हणजे त्या तारखेपर्यंत पेन्शन चालू राहील, असेही प्रीतम यांनी सांगितले. ई-जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी पीपीओ क्रमांक (पेन्शन पेमेंट ऑर्डर), बँक खाते क्रमांक आधार कार्डबरोबर जोडलेला मोबाईल नंबर या गोष्टी आवश्‍यक आहेत. त्यामुळे ज्यांना ई-जीवन प्रमाणपत्र जमा करून एक वर्ष पूर्ण झाले, असेल त्यांनीही दिलेल्या ठिकाणी जाऊन आपले ई-जीवन प्रमाणपत्र लवकरात लवकर जमा करावे, असे आवाहन केले आहे. (latest marathi news)

Pension Schema
Old Pension : मोहोळ तालुक्यातील 197 कर्मचारी संपावर; सर्वसामान्यांची झाली मोठी अडचण

ई-जीवन प्रमाणपत्र मिळणारी ठिकाणे

१) ज्या बँकेतून पेन्शन घेत आहे त्या बँकेतून

२) कॉमन सर्व्हिस सेंटर

३) कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये

४) उमंग ॲपद्वारे किंवा आपल्या मोबाईलच्या गुगल प्ले स्टोरच्या आधार फेस रीडर ॲपद्वारे,

५) क्षेत्रीय कार्यालय, भूखंड क्रमांक पी ११ एमआयडीसी क्षेत्र सातपूर, नाशिक-४

Pension Schema
Old Pension Scheme: जुन्या पेंशनचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना लागू नाही! वित्त विभागाची उच्च न्यायालयात माहिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com