Nashik Political : वाड्याच्या भिंती पडल्या पाटिलकी कायम..!

Nashik Political : वाड्याच्या भिंती पडल्या तरी पाटिलकी कायम असल्याचे एखाद्या गावात पाटिलकी लयाला गेलेल्या व्यक्तीच्या बाबतीत बोलले जाते.
Rahul Gandhi in nashik
Rahul Gandhi in nashik esakal

Nashik Political : वाड्याच्या भिंती पडल्या तरी पाटिलकी कायम असल्याचे एखाद्या गावात पाटिलकी लयाला गेलेल्या व्यक्तीच्या बाबतीत बोलले जाते. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नाशिकमधील भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने नाशिककरांना काँग्रेसच्या बाबतीत जे दिसून आले ते याच लयीतल आहे. थोडक्यात सांगायचे झाले, तर सुंभ जळाला तरी पीळ कायम आहे. असेच म्हणावे लागेल.

कारण काँग्रेसचा विचार हा होर्डिंग्ज पुरता दिसला. न्याय यात्रेचा उद्देश तळागाळातील कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत काँग्रेसचा विचार पोचविणे होता. तो उद्देश सफल झाला नाही. राहुल गांधींना स्थानिक काँग्रेसने द्वारका ते शालीमार या एक किलोमीटरच्या क्षेत्रापुरते मर्यादित केले.- विक्रांत मते

(Nashik Political articles Even after walls of patil fell down it remained marathi news)

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मागील आठवड्यात नाशिकमध्ये येऊन गेली. यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसला ऊर्जितावस्था प्राप्त करून घेण्याची मोठी संधी ढिसाळ नियोजनामुळे वाया गेल्याचे म्हणावे लागेल. काँग्रेसच्या प्रगतीचा आलेख ज्या कारणांमुळे खालावला त्यातून काही शिकण्याऐवजी आहे त्याच चुका वारंवार होत आहे. यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसला नवविचार लोकांपर्यंत पोचविण्याची चांगली संधी चालून आली होती.

धुळे शहरातून मालेगावमध्ये यात्रेने प्रवेश केल्यानंतर यात्रेला प्रतिसाद मिळाला. त्यामागे नागरिकांना राहुल गांधी यांना बघण्याचीच धडपड दिसली. त्यानंतर पिंपळगाव बसवंत ते नाशिकपर्यंत यात्रेचा प्रवास फारसा समाधानकारक राहिला नाही. राहुल गांधी यांना पाहण्यासाठी जेवढी गर्दी झाली, त्यापेक्षा कित्येक पटींनी गर्दी होणे शक्य होते.

परंतु ढिसाळ नियोजनामुळे संधी वाया गेली. गांधी यांची यात्रा नाशिकमधून जाणार तेव्हापासून नियोजन करणे आवश्‍यक होते. फक्त कोणी किती बॅनर लावायचे एवढ्यापुरतेच यात्रेचे नियोजन झाले. घराघरांत काँग्रेसचा विचार पोचविण्यासाठी यात्रेचे नियोजन झाले नाही. स्थानिक पदाधिकारी ‘पोस्टर बॉईज’ पुरते मर्यादित राहीले. (Latest Marathi News)

Rahul Gandhi in nashik
Nashik Political: दिनकर पाटील यांना भाजपने उमेदवारी द्यावी; महानुभाव पंथ, वारकरी मंडळाचे ज्येष्ठांना साकडे

अनेक वर्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेल्या राजाराम पानगव्हाणे यांनी त्यांच्या त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मा व्हॅली कॉलेज येथे गांधी यांचे स्वागत केले. चांदवडला माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी सभेचे नियोजन केले. जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांना वातावरण निर्मिती करता आली नाही. नाशिकमध्ये काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी शरद आहेर व ॲड. आकाश छाजेड यांनी शहरात वातावरण निर्मिती करणे आवश्यक होते.

मात्र ते गांधी मागे रथावरच दिसले. यात्रा मार्गावर बॅनरबाजी झाली. त्यावर आहेर, छाजेड यांचे फोटो दिसले पोस्टर बॅनर लावणे म्हणजे काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोचविणे असा होत नाही. २२ लाख लोकसंख्येच्या नाशिक शहरामध्ये किती नागरिकांपर्यंत यात्रेचा निरोप गेला. याचे उत्तर राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या दृष्टीने असमाधानकारक येईल. यात्रेच्या निमित्ताने वातावरण निर्मिती करणे आवश्यक होते ते झाले नाही, यात्रेसाठी बैठका झाल्या नाहीत.

झाल्या असतील तर ब्लॉक अध्यक्षांना माहिती नाही वा विश्वासात घेतले नाही. ब्लॉक अध्यक्षांना विश्‍वासात घेतले असते तर गर्दी अधिक वाढविता आली असती. एकाही ब्लॉक अध्यक्षांना जबाबदारी दिली गेली नाही. नियोजनात सहभागी करून घेतले नाही. देशाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार किंवा देश पातळीवरील नेता शहरात येणार असल्याने नियोजनदेखील तसे दमदार होणे गरजेचे होते. मात्र थातूरमातूर नियोजन करून यात्रा पुढे ढकलण्याचे काम झाले.

Rahul Gandhi in nashik
Nashik Political: जय बाबाजी भक्त परिवाराकडून शांतिगिरी महाराजांचा प्रचार सुरू! लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह

यात्रेचे यश पोचविण्यात नेत्यांना अपयश

काँग्रेसच्या बॅनरखाली जे निवडून येतात, त्यांच्याकडूनदेखील फारसा उत्साह दिसला नाही. शालिमार येथील सभा झाल्यानंतर भारत जोडो न्याय यात्रा थेट महापालिका हद्दीबाहेर पोचली. वास्तविक काँग्रेसचा प्रभाव असलेल्या तरण तलाव, मायको सर्कल, सातपूर या भागात स्वागत होणे गरजेचे होते. मायको सर्कल येथे स्वागत झाले. मात्र राष्ट्रीय नेत्याच्या प्रतिमेला साजेसे नव्हते.

राहुल गांधी यांची नाशिकमधील यात्रा द्वारका ते शालिमार या एक किलोमीटर पुरतीच अस्तित्वात राहिली. या पलीकडे या यात्रेचे यश पोचविण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश आले. पक्षातील ज्येष्ठ नेते कुठे दिसले नाही. जुन्याजाणत्या नेत्यांना विश्वासात घेऊन पक्षाचा प्रवाह पुन्हा जिवंत करता येणे शक्य होते ते झाले नाही. राहुल गांधी यांच्यासोबत आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा संवाद घडविणे शक्य होते. एकंदरीत भारत जोडो न्याय यात्रेचा नाशिकमधील प्रवासाचा विचार करता मागून पुढे एवढेच म्हणावे लागेल.

Rahul Gandhi in nashik
Nashik Political: मनसेंच्या प्रकल्पांना भाजपचा ‘मेकओव्हर’! ‘नमामि गोदा’ प्रकल्पांतर्गत रिलायन्स, गोदा पार्कचे पुनर्निर्माण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com