पैसे देणेघेणे आणि सुटे पैशांंची समस्या सुटणार

नाशिक : क्यूआर कोडचा वापर करताना ग्राहक
नाशिक : क्यूआर कोडचा वापर करताना ग्राहकesakal
Updated on

जुने नाशिक : टपाल विभागाचीदेखील (Post Office) आधुनिकतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. आतापर्यंत विविध प्रकारच्या आधुनिक प्रणाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात आता यूपीआय क्यूआर कोड प्रणालीची भर पडली आहे. नाशिक विभागातील ५७ कार्यालयात या प्रणालीचा प्रारंभ झाला आहे. या पद्धतीचा वापर करण्यात देशात राज्य अग्रस्थानी असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

कॅशलेस प्रणालीकडे वाटचाल या अनुषंगाने टपाल विभागाकडून (Post office) आधुनिक तंत्र प्रणालीचा उपयोग करत सुस्पष्ट व्यवहार पद्धती अमलात आणली आहे. विविध प्रकारच्या सुविधेसाठी टपाल विभागात रोख रक्कम द्यावी लागते. ही रक्कम रोख न देता यूपीआय क्यूआर कोड पद्धतीचा वापर करून ऑनलाइन टपाल विभागाच्या खात्यात संबंधित रक्कम ट्रान्स्फर करण्याची सुविधा टपाल विभागाकडून ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

मल्टिपर्पज काउंटरवर बुकिंगसाठी येणाऱ्या ग्राहकांना रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट तसेच परदेशामध्ये इंटरनॅशनल स्पीड आणि एअर पार्सल अन्य तत्सम सुविधांसाठी ही सुविधा उपलब्ध झाली आहे. केवळ कोड स्कॅन करून ग्राहक संबंधित रक्कम टपाल विभागाच्या खात्यात जमा करू शकतात. पैसे देणेघेणे आणि सुटे पैशाची टंचाई समस्या सुटणार आहे. त्यातून वेळेची बचत होणार आहे. यूटीआय क्यूआर कोड पद्धतीमुळे टपाल कार्यालय ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी डिजिटल पेमेंट (Digital payment) स्वीकारण्यासाठी सज्ज झाले आहे.

नाशिक : क्यूआर कोडचा वापर करताना ग्राहक
नाशिक : मालमत्ता धारकांना एप्रिल अखेरपर्यंत 5 टक्‍यांची सूट

याचा फायदा नेहमीचे ग्राहक तसेच मोठ्या प्रमाणात स्पीड आणि रजिस्टर बुकिंगसाठी येणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. त्यांना कॅशलेस व्यवहार करणे सोयीचे होणार असल्याचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर मोहन अहिरराव यांनी सांगितले. नाशिक टपाल विभागातर्फे प्रथम ही सुविधा शनिवारी (ता. १६) नाशिक रोड मुख्य टपाल कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर सोमवारी (ता.२५) नाशिक विभागातील संपूर्ण ५६ टपाल कार्यालयात नागरिकांना सुविधा उपलब्ध झाली आहे.

नाशिक : क्यूआर कोडचा वापर करताना ग्राहक
सर्वेक्षणे, प्रश्नमंजुषांमार्फत अनुदान आणि बक्षिसे नाहीत, पोस्टाकडून खुलासा

सुटसुटीत कॅशलेस अशी पद्धती या निमित्ताने ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. यातून ग्राहकांचा वेळ वाचणार तर आहेच शिवाय सुट्टे पैसे देणे- घेण्यावरून कर्मचारी आणि ग्राहकांच्या वादास पूर्णविराम लागणार आहे.

-डॉ. संदेश बैरागी, वरिष्ठ पोस्टमास्टर, जीपीओ कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Harshada Patil
Marathi News Esakal
www.esakal.com